चौकट=====
असे असेल अनलॉक
* सर्व अत्यावश्यक व अनावश्यक दुकाने सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहतील.
* रेस्टॉरंट, हॉटेल, परमीट रूम हे क्षमतेच्या ५० टक्के प्रमाणात सुरू राहतील. शनिवार, रविवारी पार्सल सुरू असेल.
* खुली मैदाने, उद्याने, सायकलिंग, वॉकिंग सकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत सुरू राहील.
* खासगी आस्थापना दररोज दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र, कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्के असेल.
* नाट्यगृह, सांस्कृतिक कार्यक्रम दुपारी चार वाजेपर्यंत ५० टक्के उपस्थितीच्या क्षमतेने सुरू राहतील.
* लग्नसमारंभासाठी ५० लोकांना उपस्थितीची परवानगी. अंत्यविधीसाठी २० व्यक्तींना परवानगी.
* बांधकामांना ठिकाणी दुपारी चार वाजेपर्यंत परवानगी.
* कृषीविषयक दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहतील.
* जीम, सलून, ब्युटीपार्लर, स्पा दुपारी चार वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील.
* सार्वजनिक वाहतूक व्यवस्था शंभर टक्के क्षमतेने सुरू राहील.
-------------
काही निर्बंध कायम
* दररोज दुपारी चार वाजेपर्यंत जमावबंदी तर त्यानंतर संचारबंदी कायम असेल.
* चित्रपट शूटिंगला परवानगी मात्र बंदिस्त जागा असावी.
* शॉपिंग मॉल, थिएटर पूर्णपणे बंद राहील.
* आंतरजिल्हा प्रवास सुरू. मात्र, परजिल्ह्यात जाण्यासाठी पासची गरज.
* शनिवार व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, व्यवसाय बंद.
* हॉटेल, रेस्टॉरंट शनिवारी, रविवारी बंद मात्र पार्सल सेवा, होम डिलिव्हरी सुरू.