नाशिक : वातावरणात होणारे बदल व त्याच बरोबर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव त्यामुळे बाधितांची संख्या सर्वत्र वाढताना दिसत आहे. मात्र, नाशिक विभागात आरोग्य विभागाच्या नियोजनामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. विभागात कोरोनामुक्तीचे प्रमाण ७७ टक्के इतके आहे. नाशिक विभागातील पाच जिल्ह्यात आढळलेल्या ८५ हजार २७८ रुग्णांपैकी ६५ हजार ६२६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या १७ हजार ५१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.नाशिक परिमंडळाचे आरोग्य उपसंचालक डॉ. मल्लिकार्जुन पट्टणशेट्टी यांनी ही माहिती दिली. नाशिक विभागात रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६.९६ टक्के असून, मृत्युदर २.५० टक्के इतका आहे. विभागात आत्तापर्यंत दोन हजार १३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.जळगाव जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.१५ टक्के इतके आहे. तर ७६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. धुळे जिल्ह्यात ७ हजार ६७० कोरोनाबाधित आढळले असून, त्यापैकी ५ हजार ७५७ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या १ हजार ६८६ बाधितांवर उपचार सुरू आहेत. धुळे जिल्ह्यात रुग्ण होण्याचे प्रमाण ७२.२३ टक्के इतके आहे तर या जिल्ह्यात २२७ रुग्णांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे.अहमदनगर जिल्ह्यात आत्तापर्यंत १८ हजार ९२७ कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यातील १५ हजार ६३६ रुग्ण आढळले आहेत. सध्या ३ हजार २३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या जिल्ह्यात ८२.५४ टक्के रुग्ण बरे होण्याचे प्रमाण असून, या जिल्ह्यात २६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विभागात नंदुरबार जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी असून, दोन हजार ४५ रुग्ण आढळले आहेत. यात १ हजार ७९ रूग्ण बरे झाले आहेत. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.७६ टक्के इतके असून या जिल्ह्णात आत्तापर्यंत ६५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.नाशिक जिल्ह्यातील मुक्तीचे प्रमाण ८१.५९ टक्केनाशिक जिल्ह्णात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ८१.५९ टक्के इतके आहे. जिल्ह्णात आत्तापर्यंत ३२ हजार ४९ कोरोना बाधीत रूग्ण आढळले आहेत. त्यातील २६ हजार ४९ रूग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या ५ हजार १८७ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्णात ८१३रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जळगाव जिल्ह्णात आत्तापर्यंत २४ हजार ३८७ कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यातील १७ हजार १०५ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.तर ६ हजार ५१७ बाधीतांवर उपचार सुरू आहेत.
नाशिक विभाग : मृत्युदर अडीच टक्के इतकाच कोरोनामुक्तीचे प्रमाण ७७ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 12:45 AM