चौकट-
आदिवासी विद्यार्थ्यांचे मृत्यू रोखण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या वतीने वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येतात. आजारी विद्यार्थ्यांना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना पाच हजार रुपयांपर्यंत खर्च करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत, तर शाळा व्यवस्थापन समिती एक लाखांपर्यंतचा खर्च करण्याचा निर्णय घेऊ शकते. याशिवाय अटल आरोग्य वाहिनीअंतर्गत राज्यभरात ४५ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. दरम्यान, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे मृत्यू टाळण्यासाठी राज्यात साळुंके समितीने वेगवेगळ्या उपाययोजना सुचविल्या आहेत. यात आहारात सुधारणा करणे, दोन वेळच्या जेवणांमधील अंतर कमी करणे, वेळोवेळी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करणे आदी उपाययोजनांचा समावेश आहे.
चौकट-
प्रकल्पनिहाय अनुदान प्रलंबित पालक संख्या
नाशिक - ४, कळवण - १२, नंदुरबार - ६, तळोदा - ३, धुळे -३ , यावल - २, राजूर - ६