- संजय पाठक नाशिक- गेल्या काही वर्षांपासून नाशिकमध्येही पुरी येथील जगन्नाथाच्या रथोत्सवाच्या धर्तीवर नाशिकमध्येही रथोत्सव साजरा होतो. आज हा रथोत्सव साजरा होत असताना नाशिकचे विभागीय आयुक्त प्रविण गेडाम आणि जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी चक्क झाडू मारून स्वच्छता सेवा केली.
नाशिक येथील जुना आडगाव येथील पंचमुखी हनुमान मंदिर येथून आज सकाळी जनन्नाथ यात्रा आज सकाळी काढण्यात आली. यावेळी विभागीय आयुक्त प्रविणगेडाम आणि जिल्हाधिकारी जलज शर्मा हे प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रीत होते. यावेळी त्यांनी ही सेवा केली. दरम्यान, भगवान जगन्नाथाची पुजा पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत भक्तीचरण दास यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर महिला आणि पुरूषांनी हा रथ ओढला. या रथोत्सवात हिंदू धर्मावरच जल, वृक्ष संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली.