नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा (बारावी) निकाल मंगळवारी (दि.३०) जाहीर झाला आहे. नाशिक विभागातून या परीक्षेत ८८.२२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत ९२.३८ टक्के मुली, तर ८५.११ टक्के मुलांनी यश प्राप्त केले केले असून, यंदा बारावीच्या परीक्षेत मुलांपेक्षा ७.१७ टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्याने यंदाही बारावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. नाशिक विभागातून बारावीच्या परीक्षेत ९१ हजार ८६ मुली, ८६ हजार २५१ मुले असे एकूण एक लाख ५९ हजार ३३७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १ लाख ४० हजार ५७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र गोधने यांनी पत्रकार परिषदेत दिली. या परीक्षेत ७७ हजार ५२३ मुलींसह ६३ हजार ५१ मुले उत्तीर्ण झाले. या परीक्षेत नाशिक जिल्ह्णातून ७० हजार १७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७० हजार ९९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ६१ हजार ४७ म्हणजेच ८७.९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले . धुळे जिल्ह्णात १९५ कनिष्ठ महाविद्यालयांतील २४,४४१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २४ हजार ४०९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील २२,१८६ म्हणजेच ९०.८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जळगावच्या २७७ महाविद्यालयांमधून नोंदणी केलेल्या ४९,१७९ विद्यार्थ्यांपैकी ४९,१०७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील ४३,०२७ म्हणजे ८७.६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.इन्फो - विभागात नंदुरबार अव्वल नाशिक विभागातील सर्वाधिक निकाल नंदुरबार जिल्ह्णाचा लागला. अतिशय दुर्गम भाग असलेल्या आदिवासी नंदुरबार जिल्ह्णात १४,३१५ (९१.०५ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्णातून सर्वाधिक (६१,०४७) विद्यार्थी उत्तीर्ण झाले असले तरी नाशिकमधून परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाणही अधिक असल्याने उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत नाशिकची घसरण झाली आहे. विक्रम मोडीतबारावीच्या परीक्षेत नाशिक विभागातील विद्यार्थ्यांची कामगिरी उंचावली आहे. २०१५ मध्ये ८८.१३ टक्के, २०१६ मध्ये ८३.९९ टक्के निकाल लागला होता. तर यंदा ८८.२२ टक्के असा सर्वाधिक निकाल लागला आहे.
नाशिक विभागाचा ८८.२२ टक्के निकाल
By admin | Published: May 31, 2017 12:32 AM