शहरं
Join us  
Trending Stories
1
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
2
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
3
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
4
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
5
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
6
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
7
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
8
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
9
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
10
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
11
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
12
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान
13
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
14
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
15
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अटक होणार? इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टानं जारी केलं 'अरेस्ट वॉरंट'
17
"सरकार तर स्थापन होऊ द्या"; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाना पटोलेंना झापलं
18
IND vs AUS: ना विराट, ना रोहित, ना बुमराह; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 'हा' खेळाडू ठरेल 'हिरो'- पुजारा
19
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
20
IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा

‘नाशिक पूर्व’मध्ये सकाळी निरुत्साह, दुपारनंतर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 1:16 AM

पावसाचे आगमन व मतदारांमध्ये सकाळच्या सुमारास असलेला निरुत्साहामुळे नाशिक पूर्व मतदारसंघात सुरुवातीच्या दोन तासांत अल्प मतदान नोंदविण्यात आले. त्यानंतर मात्र हवामानात बदल झाल्याने दुपारनंतर मतदारांनी उत्स्फूर्तपणे बाहेर पडत आपला मतदानाचा हक्क बजावला.

पंचवटी : पावसाचे आगमन व मतदारांमध्ये सकाळच्या सुमारास असलेला निरुत्साहामुळे नाशिक पूर्व मतदारसंघात सुरुवातीच्या दोन तासांत अल्प मतदान नोंदविण्यात आले. त्यानंतर मात्र हवामानात बदल झाल्याने दुपारनंतर मतदारांनी उत्स्फूर्तपणे बाहेर पडत आपला मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी अचानक मोठ्या संख्येने मतदार बाहेर पडल्याने फुलेनगर, उन्नती शळा, आर. पी. विद्यालय येथे मतदान संपल्यानंतरही मतदारांच्या रांगा लागल्या.नाशिक पूर्व मतदारसंघातील ३११ मतदान केंद्रावर सकाळी ७ वाजता मतदानास सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वीच सर्वच उमेदवारांच्या निवडणूक प्रतिनिधींच्या समक्ष ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्राची रंगीत तालीम घेण्यात आली. मात्र पहाटेपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाल्याने मतदारांनी घराबाहेर पडण्यास नकार दिला. त्यामुळे सुरुवातीच्या दोन तासात ७ टक्केच मतदान होवू शकले. तत्पूर्वी उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपला हक्क बजावून ते पुढच्या नियोजनाला लागले. त्यानंतर मात्र मतदारांचा ओघ वाढला. यावेळी नवमतदार, युवक-युवती व आबालवृद्धांनी तसेच साधू-महंत, अपंग व्यक्तींनी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावला. अनेक ठिकाणी मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे सापडत नसल्याने गैरसोय निर्माण झाली. तर काही मतदान केंद्रावर यंत्रात बिघाड झाल्याने काहीकाळ मतदानप्रक्रिया थांबविण्यात येऊन यंत्र बदलण्यात आले. सकाळी ११ वाजता ११ टक्के मतदान झाले. मतदारांचा ओघ कायम राहिल्याने दुपारी १ वाजता २३ टक्केमतदारांनी आपला हक्क बजावला. दुपारनंतर मात्र मोठ्या प्रमाणात मतदार घराबाहेर पडले.दुपारी ४ वाजेनंतर उन्नती शाळा, आरपी विद्यालय, आयुर्वेद महाविद्यालय येथील महापालिकेच्या शाळेत मतदारांची मोठी गर्दी वाढली. मतदानासाठी आलेल्या अंध-अपंग व्यक्तींना व अबालवृद्धांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी पोलीस कर्मचारी व शाळेतील स्वयंसेवक मदत करत होते. तसेच वृद्धांना थेट दुचाकीवर बसवून मतदान केंद्राबाहेर सोडले जात होते. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४० टक्के मतदारांनी मतदान केले. मतदान केंद्रांवर चोख पोलीस बळ तैनात करण्यात आल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फुलेनगर येथील मतदान केंद्रावर ५ वाजेनंतर मतदारांची गर्दी झाली होती त्यामुळे रात्री ८पर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे सरासरी ४७ टक्के मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.बाजार समितीत शुकशुकाटविधानसभा निवडणुकीनिमित्त नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी दुपारी कोणत्याही शेतमालाचे लिलाव झाले नाही. एरवी शेतकऱ्यांच्या वर्दळीने फुलणाºया बाजार समितीत सोमवारी दुपारी शुकशुकाट पसरला होता. मतदानामुळे सोमवारी दुपारी बाजार समितीत कोणत्याही प्रकारच्या शेतमालाचे लिलाव झाले नाही. मात्र काही शेतकरी बांधवांनी जो शेतमाल आणला होता त्याचे व्यवहार झाले. परिणामी लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचा अंदाज बाजार समितीच्या सूत्रांनी वर्तविला. सायंकाळी मतदानप्रक्रिया पार पडल्यानंतर बाजार समितीत सायंकाळचे शेतमालाचे लिलाव पूर्ववत झाले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nashik-east-acनाशिक पूर्वVotingमतदान