शहरं
Join us  
Trending Stories
1
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
2
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
3
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
4
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
5
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
6
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
7
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
8
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
9
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
10
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
11
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
12
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान
13
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
14
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
15
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अटक होणार? इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टानं जारी केलं 'अरेस्ट वॉरंट'
17
"सरकार तर स्थापन होऊ द्या"; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाना पटोलेंना झापलं
18
IND vs AUS: ना विराट, ना रोहित, ना बुमराह; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 'हा' खेळाडू ठरेल 'हिरो'- पुजारा
19
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
20
IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा

नाशिक निवडणूक निकाल : राहूल ढिकले, सीमा हिरेंसह देवळालीत राष्ट्रवादीच्या सरोज आहिरे आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 10:25 AM

Nashik vidhansabha election results 2019 नाशिक पुर्व, पश्चिम, मध्य मतदारसंघात पहिली फेरी पूर्ण झाली आहे. तसेच देवळाली मतदारसंघात दुसरी फेरी पुर्ण झाली आहे. यानंतर स्पष्ट झालेले चित्र अत्यंत धक्कादायक आहे.

ठळक मुद्देसरोज आहिरे यांना १० हजार ६०० मते मिळाली आहे

नाशिक : निवडणूकीची मतमोजणी सुरू झाली आहे. नाशिक पुर्व, पश्चिम, मध्य मतदारसंघात पहिली फेरी पूर्ण झाली आहे. तसेच देवळाली मतदारसंघात दुसरी फेरी पुर्ण झाली आहे. यानंतर स्पष्ट झालेले चित्र अत्यंत धक्कादायक आहे. उत्कंठा अधिक असलेल्या पश्चिममधून सीमा हिरे, तर पुर्वमधून राहूल ढिकले आणि मध्यमधून देवयानी फरांदे यांनी आघाडी घेतली आहे. तसेच देवळाली मतदारसंघातून शिवसेनेचे योगेश घोलप हे पिछाडीवर असून तेथे राष्ट्रवादीच्या सरोज आहिरे यांनी ७ हजार ७५४ मतांनी आघाडी घेतली आहे.

नाशिक मध्य मतदारसंघा पहिल्या फेरीअखेर देवयानी फरांदे यांना ४ हजार ८७७ तर मनसेचे नितीन भोसले यांना २हजार २९५ मते मिळाली आहे. तसेच कॉँग्रेसची मोठी वाताहत पहिल्या फेरीअखेर दिसत आहे. हेमलता पाटील यांना केवळ ८९० मते मिळाली. या मतदारसंघात एकूण ८२७५ मते पहिल्या फेरीअखेर वैध ठरली.दुसऱ्या फेरीत दुसºया फेरीत देवयानी फरांदे यांना ७ हजार ६८६ तर हेमलता पाटील यांनी अचानकपणे उसळी घेत ३हजार ९२४ मते मिळविली तर नितीन भोसले यांना ३०७६ मते पडली आहेत.नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे यांनी आघाडी घेत पहिल्या फेरीअखेर ५ हजार ९५४ मते मिळविली तर राष्ट्रवादी अपुर्व हिरे यांना ३ हजार ८८६ मते मिळाली. मनसेचे दिलीप दातीर यांना अवघे ८१२ मते मिळाली आहेत. तसेच शिवसेनेचे बंडखोेर विलास शिंदे हे मित्रपक्ष उमेदवार सीमा हिरे यांना टक्कर देत असून ३ हजार ७३७ मते मिळविली आहे.देवळाली मतदारसंघात शिवसेनेचे डॉ. योगेश घोलप यांना धक्का बसला असून त्यांना केवळ २हजार ८७१ मते तीसºया फेरीत मिळाली तर राष्ट्रवादीच्या सरोज आहिरे यांना १० हजार ६०० मते मिळाली आहे. त्यामुळे मोठ्या फरकाने आहिरे यांनी घोडदौड सुरू ठेवली आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nashik-central-acनाशिक मध्यdeoli-acदेवळीnashik-east-acनाशिक पूर्व