नाशिक-राज ठाकरे यांनी नाशिकवर विशेष स्नेह असल्याचे सांगितले असले तरी नाशिक मध्ये प्राथमिक फेरीत कोणत्याही मतदार संघात मनसे आघाडीवर नाही. त्यामुळे नाशिकमध्ये मनसे भोपळा तरी फोडणार काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
२००९ मध्ये नाशिक शहरातील चार पैकी तीन मतदार संघात मनसेचे तीन आमदार निवडून आले होते. यात वसंत गिते, दिलीप दातीर आणि अॅड. उत्तमराव ढिकले यांचा समावेश होता. यंदा पुरेशा तयारी अभावी राज ठाकरे यांनी मुंबई- पुणे आणि नाशिक या तीन मतदार संघातच निवडणूक लढविण्याचा निर्श्र्णय घेतला घेतला घेतला होता. त्यानुसार नाशिकमध्ये जिल्हयात पंधरा उमेदवार देण्याचा निर्णय घेतला होता त्यासाठी त्यांनी आयाराम- गयारामांना देखील उमेदवारी देण्याची तयारी दर्शविली होती.राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये घेतलेल्या सभेत अत्यंत भावनिक आवाहन देखील केले होते.
मनसेने नाशिक पूर्व मधून उमेदवारी दिलेल्या माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी माघार घेतली. त्यानंतर नाशिक मध्य मध्ये माजी आमदार नितीन भोसले, नाशिक पश्चिममध्ये शिवसेनेतून आलेले दिपक दातीर, इगतपूरीत नाशिक महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलेले योगेश शेवरे आणि दिंडोरीतून टीे. के. बागुल यांच्यासह सहा उमेदवार दिले होते. मात्र प्राथमिक फेऱ्यांमध्ये यातील कोणीही आघाडीवर नाही.