नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या निरंतर शिक्षण आणि आरोग्य विज्ञान विद्याशाखेच्या अंतर्गत येणाऱ्या नवीन अभ्यासकेंद्रांना शैक्षणिक मान्यता देण्यासासाठी येत्या १० एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या शिवाय प्रमाणपत्र, पदविका शिक्षणक्रमांच्या नोंदणी शुल्कात कपात करण्यात आली असल्याचेही विद्यापीठाने कळविले आहे.केंद्र आणि राज्य शासनाने कौशल्याधारित शिक्षणक्रमांना प्राधान्य दिले असून राज्यातील विद्यार्थ्यांना काम करता करता शिक्षण, नोकरी व्यवसाय, घर संसार सांभाळून शिक्षण घेण्याची सोय मुक्त विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे. या अनुसंगाने विद्यापीठाने निरिनराळे ७८ शिक्षणक्रम विकिसत केले आहेत. त्यात विशेषत: कौशल्याधारित शिक्षणक्रमांचा सर्वाधिक समावेश आहे. दरम्यान शासनानेही कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षण देण्यासाठी आग्रही भूमिका घेतल्याने विद्यापीठ प्रशासनाने शैक्षणकि वर्ष २०१८-१९साठी विद्यापीठाच्या निरंतर शिक्षण आणि आरोग्य विज्ञान विद्याशाखेच्या अंतर्गत येणार्या नवीन अभ्यासकेंद्रांना मान्यता देण्यासाठी १० एप्रिल २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यात प्रामुख्याने प्रती प्रमाणपत्र शिक्षणक्रमासाठी दोन हजार, प्रती पदविका शिक्षणक्र मासाठी तीन हजार आणि प्रती पदवी शिक्षणक्र मासाठी शुल्क आकारण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. राज्यातील विविध भागात विद्यापीठाच्या निर्देशांनुसार विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून नव्याने अभ्यासकेंद्र सुरु करू इच्छिणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी १० एप्रिल पर्यंत आपले प्रस्ताव आपल्या विभागातील मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नांदेड, अमरावती आणि नाशिक येथील विभागीय कार्यालयात सादर करावेत असे आवाहनही विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.
मुक्त विद्यापीठाच्या नवीन अभ्यासकेंद्र नोंदणीस मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 5:53 PM
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या निरंतर शिक्षण आणि आरोग्य विज्ञान विद्याशाखेच्या अंतर्गत येणाऱ्या नवीन अभ्यासकेंद्रांना शैक्षणिक मान्यता देण्यासासाठी येत्या १० एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
ठळक मुद्देशैक्षणिक मान्यता देण्यासासाठी येत्या १० एप्रिल पर्यंत मुदतनिरंतर शिक्षण आणि आरोग्य विज्ञान विद्याशाखेच्या अंतर्गत