नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघाच्या वतीने १ ते १० जूनदरम्यान देशपातळीवर पुकारण्यात आलेल्या शेतकरी संप आणि गाव बंद आंदोलनात सहभागी न होण्याचा निर्णय नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीने घेतला आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर दाद मागण्यासाठी राष्ट्रीय किसान महासंघाने देशभरातील ११० संघटनांना सोबत घेऊन आंदोलन पुकारले आहे. मात्र, शेतकºयांचे नुकसान टाळण्यासाठी या आंदोलनापासून दूर राहण्याचा निर्णय मंगळवारच्या बैठकीत घेण्यात आल्याचे समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.किसान महासंघाच्या आंदोलनात सरकारचे हस्तक सक्रिय असून, त्यांच्यामुळेच पुणतांबा येथून गेल्या वर्षी १ जून रोजी पुकारलेल्या आंदोलनात फूट पाडण्यात सरकारला यश आल्याचा आरोप बैठकीत उपस्थिती विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी केला. समितीने २५ मे रोजी आमदारांना, तर २७ मे रोजी खासदारांना घेराव घालण्याचा सोबतच १ जून रोजी शहरातून मोर्चा काढण्याचा व शेतकरी आंदोलनात हौतात्म्य पत्करणाºया शेतकºयांना अभिवादन करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकºयांच्या प्रश्नांवर संसदेचे विशेष अधिवेश बोलावून शेतकºयांची कर्जमुक्ती व शेतमालाला दीडपट हमीभावासाठी विधेयक संमत करावे, या त्यांच्या मागण्या आहेत.
देशव्यापी संपातून नाशिकच्या शेतकरी समितीची माघार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 5:53 AM