नाशिक : वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक गेल्या दहा महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून या पदाचा अतिरिक्त कारभार नाशिक वन्यजीव विभागाच्या वनसंरक्षकांकडे सोपविण्यात आला होता. सोमवारी(दि.१०) महसूल-वन मंत्रालयाकडून काढण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या करण्यात आल्या. यामुळे औरंगाबाद येथील सामाजिक वनीकरण विभागाचे वनसंरक्षक नितीन गुदगे यांची नाशिक वनवृत्ताच्या मुख्य वनसंरक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या शासनाकडून करण्यात आल्या. त्यानुसार राज्यातील ५३ अधिकाºयांना पुढील पदावर बढती मिळाली. औरंगाबादमध्ये वनसंरक्षक म्हणून कार्यरत असलेल्या गुदगे यांना नाशिक वनवृत्ताच्या मुख्य वनसंरक्षकपदी पदोन्नती मिळाल्याने या पदाची दहा महिन्यांची प्रदीर्घ प्रतीक्षा अखेर संपली. अतिरिक्त कारभार वनसंरक्षक अनिल अंजनकर यांच्याकडे अद्याप होता. गुदगे हे १९८४-८५च्या सहायक वनसंरक्षक तुकडी सरळ सेवेतील बॅचचे उत्तीर्ण अधिकारी आहेत. त्यांच्याकडे वनसेवेचा दांडगा अनुभव असून, नाशिक वनवृत्तासाठी त्या अनुभवाचा फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नाशिक जिल्हा प्रामुख्याने आदिवासी तालुक्यांचा असून, या जिल्ह्याची वनसंपदा चांगली जरी असली तरी गुजरात सीमा पूर्व-पश्चिम भागाच्या जवळ असल्याने अवैध तस्करीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. गुदगे यांच्यापुढे राज्याच्या सीमेपार होणारी खैर वृक्षाची तस्करी तसेच वन्यजिवांची तस्करी रोखण्याचे मोठे आव्हान राहणार आहे.पश्चिम भागाचे फुले यांना बढतीनाशिक पश्चिम वनविभागाचे उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांना औरंगाबाद येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या वनसंरक्षकपदावर बढती देण्यात आली आहे. ते मागील दीड वर्षांपासून नाशिकला कार्यरत होते. तसेच कार्य आयोजन विभागाचे उपवनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन यांना बोरिवली नॅशनल पार्कच्या वनसंरक्षकपदी बढती मिळाली. तसेच वनविकास महामंडळाच्या नाशिक प्रादेशिक व्यवस्थापक हे पद मागील काही महिन्यांपासून रिक्त होते. या पदावर यावलचे उपवनसंरक्षक पी. टी. मोराणकर यांची नियुक्ती करण्यात आली. औरंगाबाद सामाजिक वनीकरणाचे विभागीय वनधिकारी वाय. एल. केसरकर यांची नाशिकला मल्लिकार्जुन यांच्या रिक्तपदावर बढती देण्यात आली आहे. नाशिक पश्चिम वनविभागाच्या उपवनसंरक्षकपदाचा अतिरिक्त कारभार तूर्तास पूर्वचे तुषार चव्हाण यांच्याकडे सोपविला गेला आहे.
...अखेर नाशिकला लाभले मुख्य वनसंरक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 9:45 PM
नाशिक जिल्हा प्रामुख्याने आदिवासी तालुक्यांचा असून, या जिल्ह्याची वनसंपदा चांगली जरी असली तरी गुजरात सीमा पूर्व-पश्चिम भागाच्या जवळ असल्याने अवैध तस्करीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
ठळक मुद्देनितीन गुदगे यांची नाशिक वनवृत्ताच्या मुख्य वनसंरक्षकपदी नियुक्ती पश्चिम भागाचे फुले यांना बढती