शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

नाशिक अग्निशामक दल : आठशे किलो काचेच्या वजनाखाली दबलेल्या तरुणाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 5:49 PM

सारडासर्कलपासून अवघ्या काही मीटरवर असलेल्या अग्निशामक दलाच्या मुख्यालयातून पाच मिनिटांत अत्याधुुनिक हॅजेमेट बंबासह जवान घटनास्थळी पोहचले. तत्काळ जवानांनी दुकानामध्ये प्रवेश करुन गर्दी बाजूला करत रेस्क्यू आॅपरेशन दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सुरू केले.

ठळक मुद्दे लिफ्टिंग बॅग काचेच्या ढीगाखाली ठेवून तत्काल जवानांनी त्यामध्ये गॅस भरण्यास सुरूवात केली. कामगाराला सुखरुपपणे जीवंत बाहेर काढण्यास यशजमलेली गर्दी व फुटलेल्या काचांमुळे बचावकार्यात अडथळा

नाशिक : विविध रुग्णालय व कार्यालयांमध्ये फर्निचरच्या कामांत वापरल्या जाणाऱ्या जाड काचांच्या सुमारे ४० शीटच्या आठशे किलो वजनाखाली दबलेल्या एका कामगाराला तासाभराच्या रेस्क्यू आॅपरेशननंतर अग्निशामक व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या जवानांनी सुखरुपपणे बाहेर काढले.याबाबत सुत्रांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी, जुने नाशिकमधील सारडासर्कल परिसरात विविध फॅब्रिकेशन व ग्लास मेकर्सच्या दुकाने आहेत. या भागात असलेल्या हुजैफाभाई पत्रावाला यांच्या मालकीचे ग्लास मेकर्सचे दुकान आहे. या दुकानात काम करणारा साबीरअली हा युवक नेहमीप्रमाणे काम करत असताना अचानकपणे काचांचे तीस-चाळीश शिट खाली कोसळले. यामध्ये तो कामगार दाबला गेला. याबाबत तत्काळ परिसरातील व्यावसायिक व कामगारांना सदर प्रकार लक्षात आल्यानंतर एकच धावपळ उडाली. मोठ्या संख्येने अखंड काचांच्या शिटखाली अडकलेल्या युवकाला बाहेर काढणे शक्य नसल्याने तत्काळ प्रत्यक्षदर्शींकडून अग्निशामक दलाला घटनेची माहिती देण्यात आली.

सारडासर्कलपासून अवघ्या काही मीटरवर असलेल्या अग्निशामक दलाच्या मुख्यालयातून पाच मिनिटांत अत्याधुुनिक हॅजेमेट बंबासह जवान घटनास्थळी पोहचले. तत्काळ जवानांनी दुकानामध्ये प्रवेश करुन गर्दी बाजूला करत रेस्क्यू आॅपरेशन दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सुरू केले. पत्र्याचे दुकान आणि जमलेली गर्दी व फुटलेल्या काचांमुळे बचावकार्यात अडथळा निर्माण झाला होता.

लिफ्टिंग बॅग काचेच्या ढीगाखाली ठेवून तत्काल जवानांनी त्यामध्ये गॅस भरण्यास सुरूवात केली. यामुळे कामगाराच्या अंगावर असलेला भार वरच्या दिशेने उचलला गेला. मात्र त्याच्या पायाच्या बाजूने काही काचेचे शिट पडलेले असल्याने त्याखाली पाय अडकलेले होते. जवानांनी मोठ्या कौशल्याने इलेक्ट्रॉनिक कटरचा वापर करु काचेचे शिट कापून काढले. अत्यवस्थ गंभीरपणे जखमी झालेल्या कामगाराला सुखरुपपणे जीवंत बाहेर काढण्यास तासाभरानंतर यश आले. १०८ या अपात्कालीन वैद्यकिय सुविधा देणा-या रुग्णवाहिकेतून त्या जखमी कामगाराला उपचारार्थ रुग्णालयात त्वरित हलविण्यात आले.

या जवानांनी राबविले ‘रेस्क्यू आॅपरेशन’महापालिकेच्या शिंगाडा तलाव येथील वीर बापू गायधनी या अग्निशामक मुख्यालयाच्या जवानांनी तत्काळ धाव घेऊन रेस्क्यू आॅपरेशन राबविले. यामध्ये उपकेंद्रीय अधिकारी दिपक गायकवाड, लिडिंग फायरमन अर्जुन पोरजे, संजय राऊत, तानाजी भास्कर, मंगेश पिंपळे, अनिल गांगुर्डे, घनश्याम इंफाळ, राजू पाटील, विजय नागपुरे, संजय गाडेकर, नितीन म्हस्के, उदय शिर्के यांचा सहभाग होता.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघातfireआगNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका