घोटी : घोटी येथून नाशिकला लग्नासाठी जाणाऱ्या कारला नाशिक शहरातील उड्डाणपुलावर राणेनगर परिसरात अपघात झाल्याने या अपघातात घोटी येथील जनसेवा ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन मिलिंद देवराम वालतुले हे जागीच ठार झाले, तर इतर तिघे जखमी झाले आहेत. जखमींवर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान मिलिंद वालतुले यांच्या निधनाचे वृत्त घोटी शहरात समजताच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.घोटी येथील देवीदास शिंदे यांच्या मुलाचा नाशिक येथे विवाह होता. या विवाह सोहळ्यास घोटीतील मिलिंद वालतुले यांच्यासह दिलीप लद्दड, भगवती पतसंस्थेचे चेअरमन अशोक काळे, जनसेवा पतसंस्थेचे व्हाइस चेअरमन विठ्ठल काळे हे कार (क्र.एमएच १५ डीसी ४७०७) जात असताना नाशिक येथील उड्डाणपुलावर राणेनगर परिसरात एका कंटेनरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मिलिंद वालतुले हे जागीच ठार झाले, तर अशोक काळे, दिलीप लद्दड, विठ्ठल काळे हे जखमी झाले. यातील अशोक काळे याची प्रकृती गंभीर आहे.दरम्यान, या अपघाताचे वृत्त घोटी शहरात समजताच मिलिंद वालतुले यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. एक सामान्य कार्यकर्ता तर सहकार क्षेत्रातील जाणकार अशी त्याची घोटी शहरात ओळख होती. सहकार क्षेत्राबरोबर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे तसेच समता परिषदचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. (वार्ताहर)
नाशिक उड्डाणपुलावर अपघात; एक ठार
By admin | Published: May 15, 2015 11:53 PM