- सुयोग जोशीनाशिक - शहरात शुक्रवार ते सोमवार चार दिवसांत झालेल्या पावसाने रस्ते दुरुस्तीची तब्बल ४८ कोटी रूपयांची उधळपट्टी पाण्यात गेली आहे. त्यामुळे दररोज खड्ड्यांवरून मार्गक्रमण करणाऱ्या नाशिककरांचा मार्ग अजूनच खडतर बनत चालला आहे. महापालिकेच्या वतीने एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत रस्त्यांवरील दुरुस्तीसाठी तब्बल ४८ कोटी रूपये खर्च करण्यात आले.
गेल्या वर्षी महापालिकेने केलेल्या खराब कामांमुळे रस्त्यांची चाळण झाली होती. त्यावरून मोठा गदारोळही पाहावयास मिळाला. यंदा पावसाने दोन ते अडीच महिने शहराकडे पाठ फिरवल्याने शहरातील रस्त्यांचा प्रश्न जाणवला नाही. परंतु, सध्या सुरू असलेल्या पावसाने पालिकेच्या कामांचे पितळ उघडे पडले आहे. कोट्यवधींचा खर्च रस्त्यांवर होत असतानाही खड्डेच खड्डे दिसू लागले आहेत. शहरात यंदा खड्डे नसल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असताना दोन-तीन दिवसांच्या पावसातच हा दावा फोल ठरला आहे. बांधकाम विभाग दरवर्षी रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधींचा खर्च करते. प्रमुख चौक परिसरात रस्त्यावर डागडुजी करुन काम केल्याचा आव बांधकाम विभागाकडून केला जातो. मात्र, एक दोन पावसातच पालिकेची रस्ते दुरुस्ती पावसाच्या पाण्यात धुतली जाते.
रस्त्यांची पारदर्शकपणे कामे होणार कधी, शहरातील रस्त्यावर दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडून याचा नाहक त्रास नाशिककरांना सहन करावा लागतो. यंदाही खड्ड्यांमुळे शहरातील अनेक रस्त्यांची चाळण होऊ लागली आहे. रस्त्याच्या कामासाठी पाण्यासारखा पैसा ओतूनही शहरात खराब रस्त्यांची समस्या आजही कायम आहे. यंदाही पावसाळ्यात शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले. तसेच कॉलनी अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे महापालिका रस्त्यांवर कोट्यवधीचा रुपयांचा खर्च करूनही रस्त्यांची समस्या कायम आहे.
विभागातील रस्त्यांवर झालेला खर्चविभाग खर्चनाशिक पूर्व ११ कोटी ९० लाखपश्चिम ३ कोटी ६४ लाखपंचवटी ६ कोटी ३७ लाखसातपूर ८ कोटी ८७ लाखना.रोड ९ कोटी ९३ लाखसिडको ८ कोटी