नाशिक : राज्य शासनाचा शासन आपल्या दारी हा उपक्रम आज शनिवारी सकाळी ११ वाजता डोंगरे वसतिगृह मैदानावर होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार उपस्थित राहणार आहे. मंत्री दादा भुसे, छगन भुजबळ, गिरीश महाजन, उदय सामंत तसेच केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार, विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे उपस्थित राहणार आहेत. दुपारी मुलींच्या सैनिक प्रशिक्षण पूर्व केंद्र तसेच औद्योगिक विकास नियमावलीचा आराखडा कार्यक्रमाला मुख्यमंत्री व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
Nashik: नाशिकला आज शासन आपल्या दारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 10:09 AM