लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : भारत, अमेरिका, ब्रिटनसह जगभरातील सुमारे ७५ देशांमधील अनेक सरकारी कार्यालये, औद्योगिक कार्यालये, रु ग्णालयांमधील कॉम्प्युटर्स ‘रॅन्समवेअर’ कॉम्प्युटर व्हायरसने हॅक झाल्यानंतर या व्हायरसचा नाशिकमध्येही धोका वाढला आहे. एका कारखान्यात आलेल्या मेलमधून डाटा नष्ट झाल्याने मोठे संकट उभे राहिले होते, परंतु सायबर सेलने त्यांचा डाटा पुन्हा मिळवण्यात यश आले. अशाच प्रकारे नाशिकमधील अनेक कंपन्यांना व्हायरस असलेले मेल आल्याचा संशय असून, त्यातील काही कंपन्यांनी सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला आहे. ‘रॅन्समवेअर’चा धोका मायक्रोसॉप्टच्या परवानाप्राप्त अथवा विनापरवाना विण्डोजबेस कॉम्प्युटरला मोठ्या प्रमाणात असून, काही तांत्रिक तरतुदी करून आपला संगणक या व्हायरसपासून दूर ठेवणे शक्य आहे. त्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून संगणकावर येणारी कोणतीही अपरिचित लिंक ओपन न करता ती तत्काळ डिलीट करण्याचा सल्ला सायबर तज्ज्ञांनी दिला आहे.‘वानाक्रिप्ट २.०’ नावाच्या ‘रॅन्समवेअर’च्या माध्यमातून सायबर चोरट्यांनी ९९ हून अधिक देशांच्या महत्त्वपूर्ण सेवा बंद केल्या आहेत. आता हा धोका नाशिकपर्यंत येऊन पोहोचला असून, नाशिकमध्ये अशाप्रकारे अनेक संगणक वानाक्रि प्टने बाधित झाला असल्याचा सायबर सेलचा अंदाज आहे. नाशिकमध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या सायबर सेलच्या पोलीस ठाण्यात एका खासगी कंपनीच्या तक्रारीनंतर अशाप्रकारे व्हायरस आल्याचे स्पष्ट झाले असून, सायबर सेलच्या माध्यमातून संबंधित कंपनीचा ८० ते ९० टक्के डाटा परत मिळविण्यास यश आले असून, संपूर्ण डाटा रिकव्हर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सायबर सेल पोलीस ठाण्याचे अधिकारी अमर ठाकरे यांनी सांगितले.
नाशिकलाही ‘रॅन्समवेअर’चा फटका
By admin | Published: May 16, 2017 12:51 AM