शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
2
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
3
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
4
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
5
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
6
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
7
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
8
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
9
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
10
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
11
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
12
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
14
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
15
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
16
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
17
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
18
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
19
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

Nashik: 'मी कोपऱ्यातही गेलो नाही अन् कानातही बोललो नाही', मनोज जरांगे-पाटील यांनी स्पष्टच सांगितले

By suyog.joshi | Published: October 09, 2023 11:18 AM

Nashik: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मी मरेपर्यंत हटणार नाही. आरक्षण मिळेपर्यंत ही लढाई कायम राहील. आरक्षणाचा आनंद चेहऱ्यावर पाहिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. हे आंदोलन शांततेत होईल.

- सुयोग जोशी नाशिक - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मी मरेपर्यंत हटणार नाही. आरक्षण मिळेपर्यंत ही लढाई कायम राहील. आरक्षणाचा आनंद चेहऱ्यावर पाहिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. हे आंदोलन शांततेत होईल. आरक्षणासाठी ही पहिली आणि शेवटची लढाई आहे. आरक्षणासाठी राज्य शासनाशी बोलायला मी कोपऱ्यातही गेलो नाही अन् कानातही बोललो नाही असे प्रतिपादन मनोज जरांगे-पाटील यांनी रविवारी येथे केले. मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर निघालेले मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी (दि.८) रात्री उशिरा शहरातील सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे सकल मराठा समाजातर्फे सुरू असलेल्या साखळी उपोषणाला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.

जरांगे पाटील यांचे टाळ-मृदंगाच्या गजरात स्वागत करण्यात आले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास जरांगे पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या हस्ते मशाल पेटविण्यात आली. प्रास्ताविक राम खुर्दळ यांनी केले. गेल्या २५ दिवसांपासून साखळी उपोषणास बसलेल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचा जरांगे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सुनील बागुल, हरिभाऊ शेवाळे, संजय चव्हाण, संदीप बर्वे, नाना बच्छाव, योगेश नारकर उपस्थित होते.

समाज बांधवांचा उत्साहरात्री उशिरापर्यंत समाजातील बांधव, महिला तसेच बालक जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते, यावेळी एक मराठा लाख मराठा, कोण म्हणतं देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, मी मराठा मी कुणबी अशा घोषणा दिल्या. 

१४ तारखेला उपस्थित राहावेमराठा समाजाकडून यापूर्वी एक मराठा अशी घोषणा दिली जात होती. त्याच्यासोबत आता जरांगे पाटील यांच्यासाठी एक मराठा ग्रेट मराठा अशी घोषणा देण्यात आली. दरम्यान, १४ ऑक्टोबरला अंतरवाली सराटीत सभेला आपल्या कुटुंबास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले.

नोकरीसाठी हवे आरक्षणजरांगे पाटील म्हणाले 'मराठा आरक्षणाची लढाई २९ ऑगस्टला अंतरवेलीत सुरू झाली. तिसऱ्या दिवशी महिलांवर हल्ला. त्यांची डोके फोडण्यात आली. ज्या देशात लोकशाही, कायद्याला मानले जाते तेथे आपल्याला कुणी मारहाण करेल असा विचारही कोण्या माउलीने केला नव्हता. मराठा समाजाचे नेमके काय चुकले की, असा प्राणघातक हल्ला करण्यात आला. हा हल्ला संपूर्ण मराठा समाजावर होता. नाशिकने या आंदोलनाला वेगळी दिशा दिली आहे. आम्हाला धिंगाणा महामार्गावरही करता आला असता. मला खुर्चीचा मोह नाही. नोकरीसाठी आम्हाला आरक्षण हवे आहे. आम्ही आमचा हक्क मागत आहोत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठाMaharashtraमहाराष्ट्रNashikनाशिक