नाशिक : केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ अभियानात अखेर दुसऱ्या फेरीत नाशिक उत्तीर्ण ठरले असून, घोषित झालेल्या यादीत एकूण २७ शहरांमध्ये नाशिकने ११व्या क्रमांकावर स्थान मिळविले आहे. नाशिक महापालिकेने ‘स्मार्ट सिटी’साठी २१९४ कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केला होता. केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ अभियानात ९८ शहरांच्या यादीत स्थान मिळविलेल्या नाशिक शहराचा क्रमांक घोषित झालेल्या पहिल्या २० शहरांच्या यादीत हुकला होता. नाशिक ३४व्या क्रमांकावर होते. दरम्यान, नाशिकने दुसऱ्या फेरीत सहभागी होत स्मार्ट सिटीचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाकडे सादर केला होता. दुसऱ्या फेरीत नाशिकची निवड निश्चित मानली जात होती. त्यानुसार, २७ शहरांच्या दुसऱ्या यादीत नाशिकने ११वा क्रमांक पटकाविला आहे./सविस्तर : हॅलो
स्मार्ट सिटीत नाशिकचा समावेश
By admin | Published: September 20, 2016 11:25 PM