नाशिक : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते हे बिहारमधील लोकसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बिहारमध्ये असून, तेथून गुरुवारी (दि. १ मार्च) जिल्हा परिषदेच्या खातेप्रमुखांशी ते चर्चा करणार आहेत. आगामी अर्थसंकल्पीय सभा आणि मागील आठवड्याच्या कामकाजाचा आढावा ते बैठकीत घेणार असल्याचे समजते.मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांनी प्रशासकीय का मकाजाला गती देण्याबरोबरच कार्यालयीन शिस्तीलाही प्राधान्य दिले असून, उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्याना नोटिसा बजावल्या जात आहेत. गेल्या आठवड्यात गिते यांनी दि. २१ रोजी कार्यालयीन वेळेत विविध विभागांना अचानक भेट देऊन पाहणी केली असता कार्यालयीन वेळेत अनेक कर्मचारी गैरहजर आढळून आल्याने या कर्मचाऱ्याचे एक दिवसाचे वेतन कपात करण्यात आले आहे. याबाबतचे पत्र सामान्य प्रशासन विभागाने संबंधित विभागप्रमुखांना दिले असून, संबंधित कर्मचाऱ्यावर वेतन कपातीची कारवाई केली आहे.दोन दिवसांपूर्वीदेखील कार्यालयीन वेळेत जागेवर नसलेल्या काही कर्मचार्यांना त्यांनी नोटिसा बजावल्या आहेत. फाइलींची गती वाढविण्यावर त्यांनी भर दिल्याने दर आठवड्याला ते फाइल्सच्या प्रवासाची माहिती घेत आहेत. कार्यालयात असताना खातेप्रमुखांच्या कामकाजाचादेखील ते आढावा घेत असल्यामुळे त्यांच्या या धडक कारवाईमुळे कार्यालयीन कामकाजाला गती प्राप्त झाली आहे.येत्या ९ मार्च रोजी जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा आहे, तर गिते हे १९ तारखेपर्यंत रजेवर आहेत. या काळातील अर्थसंकल्पासंदर्भातील कामकाजाचा आढावा तसेच ३० टक्के निधी खर्चाच्या तपशीलासंदर्भात ते व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारा माहिती घेण्याची शक्यता आहे.--- इन्फो--प्रभारी पदभार पवार यांच्याकडेमुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते हे बिहार दौऱ्यावर असल्याने आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कौटुंबिक कारणास्तव रजेवर असल्यामुळे प्रभारी पदभार हा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
गिते बिहारमधून साधणार अधिकाऱ्यांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 11:02 PM
नाशिक : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते हे बिहारमधील लोकसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बिहारमध्ये असून, तेथून गुरुवारी (दि. १ मार्च) जिल्हा परिषदेच्या खातेप्रमुखांशी ते चर्चा करणार आहेत. आगामी अर्थसंकल्पीय सभा आणि मागील आठवड्याच्या कामकाजाचा आढावा ते बैठकीत घेणार असल्याचे समजते.मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांनी प्रशासकीय का ...
ठळक मुद्दे प्रशासकीय का मकाजाला गती देण्याबरोबरच कार्यालयीन शिस्तीलाही प्राधान्यउशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्याना नोटिसा बजावल्या जात आहेत.