शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

Nashik: नाशिकमध्ये बिबट्या पुन्हा लोकवस्तीत, 'मॉर्निंग वॉक'ला निघालेले पती-पत्नी बालंबाल बचावले

By अझहर शेख | Published: July 13, 2023 3:43 PM

Nashik: गुरुवारी पहाटे सव्वापाच वाजता जयभवानी रोडवरील आडकेनगर लेन-२मध्ये राहणारे  शिंदे दाम्पत्य नेहमीप्रमाणे फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडले खरे; मात्र त्याचवेळी त्यांना जीव मुठीत धरून सुरक्षितस्थळी धावावे लागले

- अझहर शेखनाशिक - गुरुवारी पहाटे सव्वापाच वाजता जयभवानी रोडवरील आडकेनगर लेन-२मध्ये राहणारे  शिंदे दाम्पत्य नेहमीप्रमाणे फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडले खरे; मात्र त्याचवेळी त्यांना जीव मुठीत धरून सुरक्षितस्थळी धावावे लागले; कारण समोरच बिबट्या झाडाच्या आडोशाला दडून बसलेला त्यांच्या नजरेस पडला. यावेळी  बिबट्या त्यांना बघून गुरगुरला आणि डरकाळी फोडत समोरच्या बंगल्याच्या कुंपणात झेप घेतली. यावेळी संरक्षक भिंतीच्या आडोशाने उभे असलेले नवनाथ शिंदे यांनी प्रसंगावधान राखत जमिनीवर झोपल्याने ते बालंबाल बचावले.

नाशिक वनपरिक्षेत्र हद्दीतील उपनगरजवळील जयभवानी रोडलगत असलेल्या आडकेनगर, लवटेनगर भागात पहाटेच्या सुमारास शिंदे दाम्पत्याला बिबट्याने दर्शन दिले. यावेळी दोघेही प्रचंड घाबरले. त्यांचे दैव बलवत्तर असल्याने बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली नाही, अन्यथा अनर्थ घडला असता. शिंदे दाम्पत्याने आजूबाजूच्या लोकांना जागे केले. त्यानंतर ‘डायल११२’ला कॉल करून माहिती दिली. पोलिसांनी वन खात्याला कळवताच रात्रीचे वन गस्तीपथक घटनास्थळी आले. सात वाजता वनपरिक्षेत्र अधिकारी वृषाली गाडे, वनपरिमंडळ अधिकारी उत्तम पाटील, अनिल अहिराव, शैलेंद्र झुटे, वनरक्षक राजेंद्र ठाकरे, दीपक जगताप, ज्ञानेश्वर शिंदे, सचिन आहेर, रेस्क्यू वाहनचालक अशोक खानझाडे, सुनील खानझोडे, प्रवीण राठोड, दर्शन देवरे यांची दोन पथके एकापाठोपाठ दाखल झाली. इको-एको-रेस्क्यूच्या स्वयंसेवकांचीही कुमक साधनसामुग्रीसह पोहोचली.लवटेनगरमध्ये व पुढे आर्टिलरी सेंटरच्याजवळ कुंपणालगत आढळून आले. यावरून बिबट्याने लष्करी हद्दीतील जंगलात धूम ठोकल्याचा निष्कर्ष वन पथकाने लावला.  जयभवानी रोडजवळ लष्करी हद्दीतील जंगल आहे. यामुळे कधी-कधी बिबट्या भरकटून लोकवस्तीत येतो. या भागातील रहिवाशांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा. परिसरात भटक्या श्वानांची संख्या जास्त असल्याचे दिसले. हे श्वान बिबट्याची सहज सोपी शिकार असल्याने त्यांच्या शिकारीसाठीही बिबट्या या भागात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी सतर्क राहावे. जॉगिंगला जाताना हातात काठी ठेवावी. शक्यतो दिवस उजाडल्यावर घराबाहेर पडावे.- वृषाली गाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, नाशिक

टॅग्स :leopardबिबट्याNashikनाशिक