नाशिक : प्रत्येक लोकसभा निवडणुकीत परिवर्तन घडविणार्या नाशिक लोकसभा मतदारसंघात यंदा शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे व राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्यातच खरी लढत असली तरी अपक्ष उमेदवार मानिकराव कोकाटे यांचा मतांचा फटका बसणार आहे. अपवाद वगळता या मतदारसंघात एकदा निवडून दिलेला खासदार पुन्हा निवडून येत नाही. गेल्या निवडणुकीत छगन भुजबळ यांचा पराभव करून हेमंत गोडसे हे मोदी लाटेवर विराजमान झाले होते. त्यामुळे गोडसे यंदा विक्र म करतात की समीर भुजबळ, याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरु वात झाली असून नाशिकमध्ये दुस-या फेरीअखेर मतमोजणीत गोडसे यांनी भुजबळांना मागे टाकले आहे. दुस-या फेरीनंतर १६ हजार १७३ मतांनी गोडसे यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना २३ हजार २७२ मतं मिळाली असून भुजबळ यांच्या पारड्यात १५ हजार ९५४ मतं पडली आहेत.नाशिक लोकसभा मतदारसंघात एकूण अठरा लाखांहून अधिक मतदार असून, यंदाच्या निवडणुकीत ५९ टक्के मतदान झालंय. गेल्या निवडणुकीत हेमंत गोडसे यांना ४ लाख ९४ हजार ७३५ मतं मिळाली होती, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार छगन भुजबळ यांना ३ लाख ७ हजार ३९९ मतं मिळाली होती.
नाशिक लोकसभा निवडणूक निकाल 2019 : दुसऱ्या फेरीअखेर हेमंत गोडसे यांनी भुजबळांना टाकले १६ हजार मतांनी मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 11:42 AM
नाशिक : प्रत्येक लोकसभा निवडणुकीत परिवर्तन घडविणार्या नाशिक लोकसभा मतदारसंघात यंदा शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे व राष्ट्रवादीचे माजी ...
ठळक मुद्देदुस-या फेरीनंतर १६ हजार १७३ मतांनी गोडसे यांनी आघाडी घेतली भुजबळ यांच्या पारड्यात १५ हजार ९५४ मतं पडली