नाशिक : प्रत्येक लोकसभा निवडणुकीत परिवर्तन घडविणा-या नाशिक लोकसभा मतदारसंघात यंदा शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे व राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्यातच खरी लढत आहे. अपवाद वगळता या मतदारसंघात एकदा निवडून दिलेला खासदार पुन्हा निवडून येत नाही. गेल्या निवडणुकीत छगन भुजबळ यांचा पराभव करून हेमंत गोडसे हे मोदी लाटेवर विराजमान झाले होते. त्यामुळे गोडसे यंदा विक्र म करतात की समीर भुजबळ, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे; मात्र मतमोजणीच्या चार फे-याअखेर गोडसे यांनी घेतलेली आघाडी कायम आहे. त्यामुळे गोडसे विक्रम करणार असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरु वात झाली असून नाशिकमध्ये नवव्या फेरीअखेर गोडसे यांनी एकूण २ लाख ३६ हजार ७६ मते मिळविली असून भुजबळांना मागे टाकले आहे. दहाव्या फेरीनंतर गोडसे यांनी ९६ हजार ३९३ मतांनी आघाडी घेतली आहे. भुजबळ यांच्या पारड्यात १ लाख ३९ हजार ६८३ मते पडली आहेत.नाशिक लोकसभा मतदारसंघात एकूण अठरा लाखांहून अधिक मतदार असून, यंदाच्या निवडणुकीत ५९ टक्के मतदान झालंय. गेल्या निवडणुकीत हेमंत गोडसे यांना ४ लाख ९४ हजार ७३५ मतं मिळाली होती, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार छगन भुजबळ यांना ३ लाख ७ हजार ३९९ मतं मिळाली होती.
नाशिक लोकसभा निवडणूक निकाल 2019: मतमोजणीच्या दहा फेऱ्या पूर्ण गोडसे यांची ९६ हजार मतांनी आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 4:32 PM
नाशिक : प्रत्येक लोकसभा निवडणुकीत परिवर्तन घडविणा-या नाशिक लोकसभा मतदारसंघात यंदा शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे व राष्ट्रवादीचे माजी ...
ठळक मुद्देदहाव्या फेरीनंतर गोडसे यांनी ९६ हजार ३९३ मतांनी आघाडी घेतली