शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

‘नाशिक महामॅरेथॉन’ला मोठ्या जल्लोषात सुरूवात, हजारो अबालवृद्धांनी घेतली धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2017 6:58 AM

लोकमत वृत्तपत्र समुहाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नाशिक महामॅरेथॉन स्पर्धेचा महाकुंभाला उगवत्या दिनकराच्या साक्षीने जल्लोषपूर्ण वातावरणात दिमाखदार सुरूवात झाली.

नाशिक : लोकमत वृत्तपत्र समुहाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नाशिक महामॅरेथॉन स्पर्धेचा महाकुंभाला उगवत्या दिनकराच्या साक्षीने जल्लोषपूर्ण वातावरणात दिमाखदार सुरूवात झाली. हजारो अबालवृध्द नाशिककरांनी ‘भागो रे...’ म्हणत धाव घेत निरामय नाशिकचा संदेश दिला. या ऐतिहासिक मॅरेथॉनमध्ये सुमारे पाच हजाराहून अधिक धावपटू सहभागी झाले होते.लोकमत वृत्तपत्र समुह आायोजित आणि दीपक बिल्डर्स अ‍ॅन्ड डेव्हलपर्स प्रस्तुत या महामॅरेथॉन स्पर्धेची उत्कंठा मागील काही दिवसांपासून शिगेला पोहचली होती. रविवारी उगवत्या सुर्यकिरणाने नाशिककरांची उत्कंठा पूर्ण झाली. मोठ्या उत्साहात जल्लोषपूर्ण वातावरणात झुम्बा नृत्याद्वारे ‘वॉर्मअप’ करत नाशिकरांनी एक धाव स्वत:साठी घेतली. पहाटे पाच वाजेपासून अनंत कान्हेरे मैदानावर (गोल्फ क्लब) धावपटूंचा मेळा भरण्यास सुरूवात झाली होती. सर्वच स्पर्धकांमध्ये मोठा उत्साह यावेळी पहावयास मिळाला. पहाटे ५ वाजेपासूनच धावपटू गोल्फ क्लब मैदानावर दाखल होण्यास सुरूवात झाली होती. यावेळी प्रमुख पाहूणे पोलीस महापौर रंजना भानसी, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, बाळासाहेब सानप, योगेश घोलप आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल, मुक्त विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. ई.वायूनंदन, दीपक बिल्डर चे दीपक चंदे, फ्रावशी चे रतन लथ, एलआयसी ची विभागीय व्यवस्थापक प्रदीप शेनॉय, फॉरचून फूड चे नरेश गुप्ता, संदीप युनिव्हर्सिटी चे चेतन चौधरी, बिझिनेस हेड एच डी एफ सी संदीप कुलकर्णी, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी  यांच्यासह ‘लोकमत’समुहाचे एक्सुकिटीव्ह डायरेक्टर करण दर्डा, महामॅरेथानच्या संयोजिका रुचिरा दर्डा, लोकमत प्रकल्पअधिकारी आशीष जैन ‘लोकमत’चे उपाध्यक्ष बी.बी.चांडक, निवासी संपादक किरण अग्रवाल आदि मान्यवर उपस्थित होते.सकाळी ६ वाजता दहा किलोमीटरमध्ये सहभागी धावपटूंना मान्यवरांनी झेंडा दाखविला. त्यानंतर ६.१५ वाजता २१ कि.मी तर ७ वाजता ३ आणि ५ किलोमीटर अंतरासाठी स्पर्धक धावले.२१, १०, ५ आणि ३ किलोमीटर अंतराच्या या स्पर्धेत हजारो नाशिककरांनी आरोग्य संवर्धनाचा संदेश देत धाव घेतली.तत्पूर्वी मैदानावर महामॅरेथॉन उद्घाटनाचा नेत्रदिपक आणि रंगारंग असा सोहळा रंगला होता.  नाशिकच्या क्रीडाविश्वात या महामॅरेथॉनमुळे उत्साह संचारलेला होता. तब्बल महिनाभरापासून नाशिक महामॅरेथॉनमय झाले होते. सर्वच गटातील मॅरेथॉनमध्ये नाशिककरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला असून आंतरराष्ट्रीय धावपटूंसह शहरातील अबालवृद्ध, व्यावसायिक, उद्योजक, अधिकारीवर्ग आणि हौशी धावपटूंनी मॅरेथॉनमध्ये धाव घेतल्याने डोळ्यांचे पारणे फेडणारे चित्र पहावयास मिळाले.महामॅरेथानमध्ये स्हभागी होण्यासाठी काही परदेशी धावपटू देखील कुटूंबासह धावणार आहेत तर राज्यातील मुंबई, नागपूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, परभणी, बुलढाणा, जालना, सांगली, पुणे, औरंगाबाद आदि शहरांमधून धावपटू नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.दरम्यान, या स्पर्धेसाठी मॅरेथॉन मार्गावर नियोजन करण्यात आले असून रॅली मार्गावर येणारे सर्व उपरस्ते बंद करण्यात आलेले आहेत. मार्गावर ठिकठिाणी पोलीस बंदोबस्त, स्वयंसेवक तसेच मार्गदर्शक सज्ज आहेत.

आंतरराष्ट्रीय धावपटूंचा मॅरेथॉनमध्ये सहभागकविता राऊत, मोनिका आथरे, संजिवनी जाधव, दुर्गा देवरे, रोर्इंगपटू दत्तू भोकनळ, आंतरराष्ट्रीय ट्रायथलॉन खेळाडू सुमेध वाव्हळ आदिंनी महामॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन धाव घेतली. दरम्यान, या आंतरराष्ट्रीय किर्तीच्या खेळाडूंचा उत्साह बघून सहभागी नाशिककरांनाही प्रोत्साहन लाभले.

असा आहे २१ कि.मी.चा मार्ग

गोल्फ क्लब, धामणक र चौक (वेदमंदीर), मायको सर्कल, वनविभागाचे कार्यलय, एबीबी सर्कल, आयटीआय सिग्नल, महिंद्र सर्कल, पपया नर्सरी, महापालिकेची कमानीतून पुढे त्र्यंबकेश्वरच्या दिशेने हॉटेल संस्कृती (बेळगाव ढगा), येथून यू-टर्न घेत पुन्हा याच मार्गाने गोल्फ क्लब फिनिश लाईनवर स्पर्धक पोहचणार आहेत.

असा आहे १० कि.मीचा मार्ग

गोल्फ क्लब मैदान, धामणकर चौक, मायको सर्कल, जलिसंचन भवन, शासकिय वसाहत, उंटवाडी सिग्नल, ठक्कर डोम, एबीबी सर्कल ला वळसा घालून त्र्यंबकरोडने सिब्बल हॉटेल, यामाहा शोरु म, वनविभाग कार्यालयमार्गे मायको सर्कलवरून धामणकर चौकातून सर्व धावपटू फिनिश लाईन गोल्फ क्लब येथे पोहचणार आहे.

असा आहे ५ कि.मी.चा मार्ग

गोल्फ क्लब मैदान, मायको सर्कल, एबीबी सर्कलवरून डावीकडे वळण घेत ठक्कर डोमद्वारे, सिटीसेंटरसमोरील रस्त्याने लक्षिका मंगल कार्यालयमार्गे उंटवाडी रस्त्याने संभाजी चौक, दक्षिणमुखी हनुमान मंदीर, मायको सर्कलवरून पुन्हा गोल्फ क्लब फिनिश लाईनवर स्पर्धक पोहचतील.

असा आहे फॅमिली रनचा (३.कि.मी) मार्ग

गोल्फ क्लब मैदान, मायको सर्कल, त्र्यबकरस्त्याने शासकिय दुध डेअरीमार्गे डाव्या बाजूकडे वळण घेत संभाजी चौकामध्ये स्पर्धक येथील तेथून दक्षिणमुखी हनुमान मंदीरासमोरून मायको सर्कलवरून गोल्फ क्लब फिनिश लाईनवर पोहचतील.सुसज्ज व्यवस्थेमुळे समाधानमहामॅरेथॉनसाठी ‘लोकमत’च्या वतीने सुसज्ज व्यवस्था व उत्तम नियोजन करण्यात आल्याने धावपटूंमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले. पाच व दहा कि.मीच्या मार्गाला जोडणारे सर्व उपनगरीय रस्ते बॅरेकेडिंग करु न बंद करण्यात आले होते. तसेच रस्त्यावर दिशादर्शक, मार्गदर्शक फलक लावण्यात आले होते. प्रत्येक किलोमीटरवर ‘लोकमत’चे स्वयंसेवक नियुक्त करण्यात आले होते. सर्व नियुक्त स्वयंसेवक धावपटूंना एनर्जी ड्रिंकसह पाण्याची बॉटल हातात ‘रेडी’ करु न देत होते.

वैद्यकिय खबरदारीधावपटूंचे आरोग्यासह वैद्यकिय खबरदारी घेण्यात आली होती. दोन्ही मार्गांवर कार्डियाक अम्ब्युलन्स फिरतीवर होती. या रुग्णवाहिकेच्या बिनतारी संदेश यंत्रणेच्या फ्रिक्वेन्सी क्र मांक 1सोबत स्वयंसेवकांच्या वॉकी-टॉकी कनेक्ट होत्या. याबरोबरच फिजिओथेरिपस्टची टीमही उपलब्ध करून देण्यात आली होती.

टॅग्स :Sportsक्रीडा