नाशिक : कृषी उत्तन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांना कंत्राटी कामगारांना नियुक्तीपत्र देण्याच्या बदल्यात तीन लाख रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने शुक्रवारी (दि.१६) बाजार समितीच्या मुख्य कार्यालयातून अटक केली आहे. बाजार समितीतील कंत्राटी कामगारांना नियुक्तीची प्रक्रिया सुरू असून या प्रक्रियेअंतर्गत नियुक्तीपत्रासाठी बाजारसमितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांच्याकडून संबधित कामगारांकडून रोख रकमेची मागणी होत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. त्यानुसार एसीबीच्या अधिकारºयांना बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात सापळा रचून चुंभळे यांना लाच स्विकारताना रंगेहात पकडले. या प्रकरणात कंत्राटी कामगाराकडून चुंभळे यांनी १० लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर ३ लाख रुपयांची रक्क ठरली. मात्र संबधित कामगाराने या प्रकरणाची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागालाही दिली. त्यामुळे ठरलेली रक्कम सुपुर्द करण्यासाठी संबधिक कर्मचारी बाजार समितीच्या मुख्यालयात गेला असता एसीबीच्या अधिकाºयांना सापळा रचून चुंभळे यांच्यावर नजर ठेवली आहे. यावेळी चुंभळे यांनी तीन लाखाची रक्कम स्विकारताच अधिकाºयांनी कारवाई करून त्यांना अटक केली. या कारवाईमुळे शिवाजी चुंभळे यांच्या अडचणीत वाढ निर्माण झाली असून त्यांची राजकीय कारकीर्दही धोक्यात आली आहे.शिवाजी चुंभळे यांनी महापालिकेत नगरसेवक आणि स्थायी समिती सभापती अशी पदे भूषविली असून गेल्यावेळी त्यांनी ते विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी करून प्रतिस्पर्धी उमेदवारांसमोर कडवे अव्हान निर्माण केले होते. त्याचप्रमाणे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ते शिवसेनेकडून उमेदवारी करण्यासाठी इच्छुक होते. त्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात तयारी करून प्रतिस्पर्धी उमेदवारांना आव्हान निर्माण केले होते. परंतु, त्यांना लोकसभेचे तिकिट मिळविण्यात यश आले नसले तरी ते आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करती असताना अशा प्रकारे त्यांना अटक झाल्याने हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठा धक्का मानला जात आहे.
नाशिक बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांना लाच घेताना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 4:14 PM
तीन लाख रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने शुक्रवारी (दि.१६) बाजार समितीच्या मुख्य कार्यालयातून अटक केली आहे.
ठळक मुद्देशिवाजी चुंभले यांना लाच स्विकारताना अटक कृषी उत्पन्न बाजार समीतीत रंगेहात पकडलेलाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई