नाशिक बाजार समितीत सध्यातरी पालेभाज्यांची आवक स्थिर आहे. टोमाटोसह पालेभाज्यांचे भाव घसरलेले आहेत. टोमाटोला ३०० ते ८०० रुपये क्ंिवटल भाव मिळत आहे, तर २० किलोची जाळी ६० ते १६० रुपयांना विक्री होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
कोथिंबीर (गावरान) १००० ते ३५००, मेथी १००० ते २०००, शेपू ८०० ते १५००, तर पालक १०० ते १९० रुपये प्रत्येकी १०० जुडीचा भाव आहे. डाळिंबाचेही भाव घसरले आहेत. २० किलोची जाळी ९०० ते ९५० रुपयांपर्यंत विक्री होत आहे. त्यामुळे उत्पादक हैराण झाले आहेत. परजिल्ह्यातून येणाऱ्या डाळिंब मालाची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्यातच थंडीमुळे डाळिंबाची मागणी घटल्याने बाजारभाव कोसळलेले शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. नाशिक फळ बाजारातून कोलकाता, दिल्ली, बिहार, तसेच उत्तर प्रदेश राज्यात मोठ्या प्रमाणात डाळिंबाची निर्यात केली जाते.