नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतक-यांची खुलेआम लूट केली जात असून, विक्रीसाठी माल आणणा-या शेतक-यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याची तक्रार गोदा व्हॅली फार्मर प्रोड्युसर संस्थेचे रवी अमृतकर यांनी बाजार समितीचे प्रशासकांकडे केली आहे.या संदर्भात दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणा-या शेतमालाची नोंद बाजार समितीकडे असणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतक-यांया समस्या निर्मुलनासाठी आणि समस्यांच्या मुळाशी आपल्याला पोहोचता येईल. शेतक-यांना आॅन लाईन पेंमेंटचे महत्व आता पटू लागल्यामुळे बाजार समितीमधील व्यवहारांचे शेतक-यांचे पेमेंट हे व्यापा-यांनी तात्काळ बॅँकेमार्फत करण्याचे बंधन घालून द्यावे जेणे करून शेतक-यांना त्याचा फायदा होणार आहे. व्यापा-यांमध्ये खुली स्पर्धा असण्यासाठी शेतमाल जास्तीत जास्त किंमतीत खरेदी व्हावा यासाठी उपाययोजना कराव्यात. शेतमालाची मोजणी पारदर्शकपणे होऊन शेतक-यांना ते पेमेंट मिळेल याची व्यवस्था करावी. शेतक-यांच्या समस्यांसाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करावी. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दैनंदिन कामकाजात सुसूत्रता येण्यसाठी रात्री येणा-या श्ोतमालाच्या विक्रीसाठी शेतक-याला संरक्षण, शेतक-याला सुविधा मिळाव्यात. बाजार समितीमध्ये उजेड असावा, सध्या काही ठिकाणी अंधारात खरेदी-विक्री सुरू असते. शेतकºयाला आणि व्यापा-यांना भयमुक्त, दहशतमुक्त वातावरण हवे, पोलीस यंत्रणा पुर्ण क्षमतेने कार्यरत राहील यासाठी बाजार समितीने प्रयत्न करावेत, त्यासाठी सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे असावेत. हमालांना पोलीसांकडून वर्तुणूकीचा दाखला असल्याशिवाय प्रवेश देऊ नये, गुंडागर्दी मोडून काढावी.बाजारातील वाहतूक व्यवस्था सुरूळीत राहील, पार्किंग राहील याचे नियोजन करावे. बाजार समितीचे उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी उपाययोजना आखावेत. शेतक-यांना विश्रामाची व्यवस्था, मालाची सुरक्षितता, स्वच्छता गृह, पिण्याचे पाणी उपलब्ध असावे, पेठरोड व नाशिकरोड येथील बाजार समिती आवारातील रस्त्यांची अल्पावधीत झालेली दुरावस्था पाहता ती दुरूस्त व्हावी अशी मागणीही त्यात करण्यात आलाी आहे.
नाशिक बाजार समितीत शेतक-यांची लूट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 2:58 PM
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणा-या शेतमालाची नोंद बाजार समितीकडे असणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतक-यांया समस्या निर्मुलनासाठी आणि समस्यांच्या मुळाशी आपल्याला पोहोचता येईल.
ठळक मुद्देगोदा व्हॅलीचा आरोप : प्रशासकांना लक्ष देण्याची विनंतीशेतक-यांचे पेमेंट हे व्यापा-यांनी तात्काळ बॅँकेमार्फत करण्याचे बंधन