नाशिक : गुरुवारी ९.२ अंशांवर घसरलेल्या शहराच्या किमान तपमानाच्या पाºयामध्ये सातत्याने चढ-उतार सुरू आहे. शनिवारी (दि.२३) १०.५ अंश इतके किमान तपमान नोंदविले गेले.शहराच्या हवामानामध्ये बदल होत असून, ढगाळ हवामानामुळे किमान तपमानावरही त्याचा परिणाम जाणवत आहे. शुक्रवारी ढग दाटून आल्याचे चित्र होते त्या तुलनेत शनिवारी ढगाळ हवामान काहीसे कमी प्रमाणात राहिले. शुक्रवारी ११.२ इतके किमान तपमान नोंदविले गेले, तर शनिवारी पारा १०.५ अंंशांवर स्थिरावला. एकूणच शुक्र वारच्या तुलनेत शनिवारी थंडीची तीव्रता अधिक जाणवत होती. नाशिककरांना सध्या गुलाबी थंडीचा अनुभव येत आहे. शनिवारी पहाटे थंडीची तीव्रता कमालीची जाणवली. संध्याकाळी ६ वाजेपासून हवेत गारवा निर्माण झाला होता. थंडीचा कडाका कायम राहिल्याने नाशिककर सध्या गारठले आहे. वातावरणात होणाºया बदलामुळे काही नागरिकांना आरोग्याचा त्रासही होत आहे. सर्दी-पडसेच्या तक्रारी वाढत असल्याचे चित्र दवाखान्यांमध्ये पहावयास मिळत आहे. विशेषत: थंडीच्या तीव्रतेचा सर्वाधिक त्रास लहान मुलांना व ज्येष्ठ नागरिकांना होत आहे. कमाल तपमानाचा पारादेखील फारसा वाढत नसून ३० अंशांच्या पुढे पारा सरकत नसल्यामुळे हवेत गारठा जाणवत असल्याचे हवामान निरीक्षकांचे म्हणणे आहे. नोव्हेंबरच्या अखेरच्या दिवशी १०.२ अंशांपर्यंत नीचांकी तपमानाची नोंद झाली होती; मात्र डिसेंबर महिन्याच्या प्रारंभापासून थंडीची तीव्रता कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळत होता; मात्र किमान तपमानाचा पारा पुन्हा वेगाने घसरल्यामुळे पुढील दहा दिवस कडाक्याची थंडी राहणार असल्याची शक्यता आहे.
नाशिकचा पारा १०.५ अंशांवर चढ-उतार : थंडीची तीव्रता कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 1:07 AM
नाशिक : गुरुवारी ९.२ अंशांवर घसरलेल्या शहराच्या किमान तपमानाच्या पाºयामध्ये सातत्याने चढ-उतार सुरू आहे. शनिवारी (दि.२३) १०.५ अंश इतके किमान तपमान नोंदविले गेले.
ठळक मुद्देकिमान तपमानावरही परिणामनाशिककर सध्या गारठले