शहरं
Join us  
Trending Stories
1
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: विजयाचे श्रेय पंतप्रधान मोदींना- हरयाणाचे मुख्यमंत्री सैनी यांची प्रतिक्रिया
2
Uddhav Thackeray : "गद्दारांना ५० खोके आणि बहिणीला फक्त १५०० रुपये; हा महाराष्ट्रधर्म नाही" - उद्धव ठाकरे
3
ढोल वाजवले, फटाके फोडले; लाडू, जिलेबी वाटली, पण… काँग्रेसच्या उत्साही कार्यकर्त्यांवर नामुष्की 
4
"...हाच आजच्या निवडणूक निकालाचा धडा"; अरविंद केजरीवाल निकालावर काय म्हणाले?
5
ओमर अब्दुल्ला होणार जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री; विजयानंतर फारुख अब्दुल्लांची घोषणा
6
'त्या' लोकांना दहशतवाद्यांसारखी वागणूक द्या; तुषार गांधींची उद्धव ठाकरेंकडे मागणी
7
हरयाणात 'मोदी मॅजिक', राहुल गांधींनी जिथे सभा घेतल्या, त्या उमेदवारांचे काय झाले? पाहा...
8
Bharti Airtel करणार Tata Group सोबत मोठी डील, टाटांची 'ही' कंपनी खरेदी करण्याची तयारी
9
Haryana Election Result : "हरयाणात नक्कीच काँग्रेस पक्ष सरकार स्थापन करेल...", विनेश फोगाटचा दावा
10
गाडीसाठी 20, घरासाठी 60 लाख... हरयाणाच्या आमदारांना किती वेतन मिळते? 
11
हरयाणात काँग्रेसला अजुनही होप्स...? 'या' जागा ठरवणार कोणाचे सरकार, मताधिक्य केव्हाही....
12
YouTuber ने ठोकली १.७ कोटींची सुपरकार, गाडी चालवताना करत होता Live स्ट्रीम (Video)
13
"आधी बायकोसाठी बाथरुम बांधणार", 'बिग बॉस मराठी' विजेता सूरज चव्हाणचं वक्तव्य, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
14
मोदी बागेत रणनीती! सुप्रिया सुळेंच्या कारमध्ये चेहरा लपवणारा 'ती' व्यक्ती कोण?
15
Bigg Boss 18 : "तुम्ही माझ्या हृदयात स्थान बनवलं आहे", 'बिग बॉस'च्या घरात सदावर्तेंचं चाललंय तरी काय?
16
Post Office Scheme: दररोज ३३३ रुपये वाचवून करा गुंतवणूक, १० वर्षांनी तयार होईल लाखोंचा फंड
17
Eknath Shinde News : मंत्रिमंडळ बैठकीसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आजचे सर्व कार्यक्रम अचानक रद्द, कारण...
18
अजित पवारांची आमदार संजयमामा शिंदेंनी वाढवली डोकेदुखी, विधानसभा निवडणुकीबद्दल घेतला मोठा निर्णय
19
"ती खूप रडली, खोलीत स्वत:ला..." सलमानसोबतचा सिनेमा बंद झाल्यावर आलियाची झालेली अशी अवस्था
20
Ashok Gehlot : "ही विचारधारेची लढाई, शेवटी काँग्रेस..."; हरयाणा निकालावर अशोक गेहलोत यांचं मोठं विधान

मिरजकर सराफ, त्रिशा जेम्सच्या फरार संचालकांविरोधात रेडकॉर्नर नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 10:41 PM

नाशिक : आर्थिक व सुवर्ण तारणावर दरमहिना एक ते दीड टक्के व्याजाचे आमिष दाखवून मिरजकर सराफ व गंगापूररोडवरील त्रिशा जेम्सने गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे़ आर्थिक गुन्हे शाखेकडे आतापर्यंत ५०० गुंतवणूकदारांनी फसवणुकीच्या तक्रारी केल्या असून, गुंतवणूकदारांची संख्या हजारपर्यंत तर फसवणुकीची रक्कम शंभर कोटींपर्यंत असल्याची माहिती सोमवारी (दि़३०) ...

ठळक मुद्देगुंतवणूकदार फसवणूक : तक्रारदारांची संख्या ५०० वरफरार संचालकांच्या मालमत्तांचा शोध सुरू

नाशिक : आर्थिक व सुवर्ण तारणावर दरमहिना एक ते दीड टक्के व्याजाचे आमिष दाखवून मिरजकर सराफ व गंगापूररोडवरील त्रिशा जेम्सने गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे़ आर्थिक गुन्हे शाखेकडे आतापर्यंत ५०० गुंतवणूकदारांनी फसवणुकीच्या तक्रारी केल्या असून, गुंतवणूकदारांची संख्या हजारपर्यंत तर फसवणुकीची रक्कम शंभर कोटींपर्यंत असल्याची माहिती सोमवारी (दि़३०) गुंतवणूकदारांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन दिली़ दरम्यान, या दोन्ही फर्ममधील फरार संचालकांच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे़ याबरोबरच संचालकांचे बँक खाते गोठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, या पेढ्यांमधील डाटासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली जाणार आहे़

अ‍ॅड. पल्लवी उगावकर-केंगे यांच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मिरजकर सराफी पेढीचे महेश मिरजकर, हर्षल नाईक यांच्यासह ११ संचालक-कर्मचाऱ्यांविरोधात १९ जुलै रोजी फसवणूक तसेच महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी)गुन्हा दाखल करण्यात आले आहे़ यातील फसवणुकीची रक्कम अधिक असल्याने हा गुन्हा शहर आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे़ आतापर्यंत सुमारे पाचशे गुंतवणूकदार पोलिसांपर्यंत पोहोचले असून, फरार संचालकांपर्यंत अद्याप पोलीस पोहोचलेले नाहीत़

मिरजकर व त्रिशाचे संचालक विदेशात फरार होऊ नये यासाठी गृहविभागाने रेडकॉर्नर नोटीस जारी केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे़ याबरोबरच फरार संचालकांच्या ज्या-ज्या बँकांमध्ये खाते आहे त्या बँकांकडे पत्रव्यवहार करण्यात येऊन ती खाती गोठविण्यासंदर्भातील पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत. दरम्यान, येत्या काही दिवसांत फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची एकत्रित बैठक पोलिसांकडून घेतली जाणार आहे़अवैध सराफी योजना रडारवरमिरजकर व त्रिशा जेम्समधील फसवणुकीनंतर पोलीस सतर्क झाले असून, शहरातील सराफी व्यावसायिकांमार्फत चालविल्या जाणाºया योजनांची माहिती घेतली जाणार आहे़ ज्या सराफी व्यावसायिकांकडे अवैध योजना सुरू असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले़बहुतांशी गुंतवणूक नोटाबंदी कालावधीतीलमिरजकर सराफ व त्रिशा जेम्समध्ये काही गुंतवणूकदारांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे़ या गुंतवणूकदारांना आर्थिक परतावा न देता या दोन्ही फर्मच्या संचालकांनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे़ तर नोटाबंदीच्या काळात मोठी गुंतवणूक झाल्याची चर्चा आहे़

स्थावर मालमत्तेचा शोध सुरू

फरार संशयितांची बँकेतील खाते तसेच स्थावर मालमत्तेचा शोध सुरू आहे़ याबाबत नागरिकांना माहिती असल्यास त्यांनी बिनदिक्कतपणे पोलिसांना माहिती द्यावी़ माहिती देणाºयाचे नाव गुप्त ठेवले जाणार आहे़ नागरिकांना गुंतवणूक करताना योग्य ती काळजी घ्यावी तसेच अशाप्रकारच्या फसव्या योजनांमध्ये गुंतवणूक करू नये.- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त. 

टॅग्स :NashikनाशिकGoldसोनंfraudधोकेबाजी