शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

नाशिकमध्ये मनसेला मोठा धक्का; शहराध्यक्ष दिलीप दातीर यांचा राजीनामा

By संजय पाठक | Published: April 19, 2023 2:02 PM

दिलीप दातीर हे शिवसेनेचे नगरसेवक असताना त्यांनी राजीनामा देऊन मनसेत प्रवेश केला होता.

नाशिक - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नाशिक महापालिकेमध्ये 2012 मध्ये  सत्ता मिळवली होती. त्यानंतर पक्षाची अवस्था बिकट असली तरी गटबाजी मात्र थांबलेली नाही. त्यातच मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून आपल्याला पद मुक्त करावे अशी विनंती करणारे पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पाठवले आहे.

दिलीप दातीर हे शिवसेनेचे नगरसेवक असताना त्यांनी राजीनामा देऊन मनसेत प्रवेश केला होता. २०१९ मध्ये मनसेच्या माध्यमातून पश्चिम नाशिक विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती त्यात त्यांचा पराभव झाला होता. दरम्यान त्यानंतर त्यांना राज ठाकरे यांनी शहराध्यक्षपदी नियुक्त केले होते. नाशिकमध्ये मनसेत मोठ्या प्रमाणात गटबाजी असून त्याची वेळोवेळी चर्चा होत असते, त्यातच दातीर यांनी राजीनामा दिल्यामुळे उलट सुलट चर्चा होत आहे.

दिलीप दातीर यांच्याशी संपर्क साधला असता आपला व्यक्तिगत कारणामुळे हा राजीनामा दिला असून आपण पक्ष सोडलेला नाही. पुढील आठवड्यात आपण राज ठाकरे यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडणार असल्याचे ते म्हणाले. 

टॅग्स :MNSमनसेNashikनाशिक