शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
4
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
6
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
7
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
8
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
9
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
12
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
13
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
14
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
15
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
16
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
17
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
18
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
19
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
20
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत

नाशिकच्या खासदाराचा आज फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 1:03 AM

नाशिक लोकसभा मतदारसंघात अठरा उमेदवार रिंगणात असले तरी, अखेरच्या क्षणापर्यंत चुरशीच्या झालेल्या तिरंगी लढतीकडे साऱ्यांचेच लक्ष लागून आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे पुन्हा निवडून येऊन विक्रम करतात की, माजी खासदार समीर भुजबळ हे मतदारसंघ खेचून आणतात, याबरोबरच अपक्ष माणिकराव कोकाटे यांच्या उमेदवारीचा फटका व फायदा कोणाला होतो यावरच विजयाचे गणित आहे.

नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघात अठरा उमेदवार रिंगणात असले तरी, अखेरच्या क्षणापर्यंत चुरशीच्या झालेल्या तिरंगी लढतीकडे साऱ्यांचेच लक्ष लागून आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे पुन्हा निवडून येऊन विक्रम करतात की, माजी खासदार समीर भुजबळ हे मतदारसंघ खेचून आणतात, याबरोबरच अपक्ष माणिकराव कोकाटे यांच्या उमेदवारीचा फटका व फायदा कोणाला होतो यावरच विजयाचे गणित आहे.या निवडणुकीत कोणीही उमेदवार निवडून आला तरी वेगळा विक्रम नोंदविला जाणार आहे.नाशिक लोकसभा मतदारसंघात २९ एप्रिल रोजी १९०७ मतदान केंद्रांवर ५९.४३ टक्के मतदान झाले होते. १८ लाख ८२ हजार १११ मतदारांपैकी ११ लाख १८ हजार ५२० मतदारांनी आपला हक्क बजावला. त्यात ६ लाख १५ हजार ६६५ पुरुष, तर ५ लाख २ हजार ८५० महिला मतदारांचा समावेश आहे. गुरुवारी (दि. २३) अंबडच्या सेंट्रल वेअर हाउसमध्ये सकाळी आठ वाजता कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी करण्यात येणार आहे.सायंकाळपर्यंत मतदारांचा कौल कळणार असला तरी, यंदाच्या निवडणुकीत माजी आमदार माणिकराव कोकाटे यांची अपक्ष उमेदवारी व बहुजन वंचित आघाडीने पवन पवार यांना दिलेल्या उमेदवारीमुळे सत्ताधारी व विरोधी पक्षांचे निवडणुकीचे गणित बदलून टाकले आहे. त्यामुळे सर्वच उमेदवार विजयाचा दावा करीत असले तरी, खात्री कोणीच देत नाही, हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य आहे. या मतदारसंघाचा पूर्वेतिहास पाहता, निवडणुकीत प्रमुख तीन उमेदवारांपैकी जो कोणी बाजी मारेल तो त्या उमेदवाराचा विक्रम असेल.या उमेदवारांच्या निकालाकडे साऱ्यांचे लक्षहेमंत गोडसे । शिवसेना : दोन वेळा लोकसभेची निवडणूक लढवून एकदा विजयी झाालेले हेमंत गोडसे तिसºयांदा शिवसेनेकडून रिंगणात उतरले आहेत. जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवकपदावरून थेट संसद गाठणाºया गोडसे यांना सेनेने पुन्हा उमेदवारी दिल्यामुळे पक्षांतर्गत काहीशी नाराजी होती. परंतु त्यावर मात करून गोडसे यांनी गेल्या पाच वर्षांतील कामगिरीवर मतदारांसमोर गेले. केंद्रात पुन्हा मोदी सरकार सत्तेवर आणण्यासाठी भाजपानेही त्यांच्या विजयासाठी प्रयत्न केले.समीर भुजबळ । राष्टवादी : २००९ मध्ये पहिल्यांदाच खासदार झालेले समीर भुजबळ यांची पुन्हा दुसºयांदा गोडसे यांच्याविरोधात लढत होत आहे. खासदारकीच्या काळात केलेली कामे व गेल्या पाच वर्षांत रखडलेला विकास तसेच केंद्र सरकारच्या नोटबंदी, जीएसटी, महागाईच्या मुद्द्यावर भुजबळ निवडणुकीला सामोरे गेले. कॉँग्रेस, रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने त्यांना पाठिंबा दिला आहे.माणिकराव कोकाटे । अपक्ष : सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे तीन वेळा आमदार राहिलेले माणिकराव कोकाटे भाजपाकडून लोकसभेसाठी इच्छुक होते. परंतु युती झाल्यामुळे त्यांनी बंडखोरी करीत हेमंग गोडसे यांना अडचणीत आणले. जिल्हा बॅँकेचे संचालक व आमदारकीच्या काळात केलेल्या कामाच्या बळावर ते निवडणुकीला सामोरे गेले आहेत. त्यांची उमेदवारी सत्ताधारी व विरोधकांना अडचणीची ठरली.अगोदर होणार पोस्टलमतपत्रिकांची मोजणीसकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असली तरी, सर्वात प्रथम पोस्टल मतदानाची मोजणी होईल. त्यासाठी प्रत्येक मतदारसंघात चार टेबल लावण्यात आले आहेत. पोस्टल मतमोजणी सुरुवात झाल्यानंतर अर्ध्या तासात आयोगाच्या परवानगीनुसार ईव्हीएममधील मतमोजणी केली जाईल. प्रत्येक टेबलची फेरी पूर्ण झाल्याशिवाय नवीन फेरी होणार नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९nashik-pcनाशिक