नाशिक : महापालिकेच्या वतीने बससेवा सुरू करण्यासाठी कंपनी सुरू करण्याची प्रकिया होत असताना दुसरीकडे मात्र अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कंपनीत सत्तारूढ आणि विरोधी पक्षांचा गटनेता ही दोन पदे संचालक म्हणून नियुक्त करण्यात आली असली तरी या दोन्ही पदांचा कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.राज्य शासनाने संमत केलेल्या महापालिका अधिनियमानुसार सत्तारूढ पक्षाचा गटनेता हाच सभागृह नेता असतो आणि विरोधी पक्षातील मोठ्या गटाचा नेता हाच विरोधी पक्षनेता असतो. अशा परिस्थितीत महापालिकेने सत्तारूढ पक्षाचा गटनेता आणि विरोधी पक्षाचा गटनेता ही दोन मनपा अधिनियमात वैधानिक नसलेली पदे घुसवली आहेत. त्यामुळे हा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.महापालिकेत लोकप्रतिनिधींची सत्ता सुरू झाली. त्यावेळी सत्तारूढ पक्षाचा सभागृह नेता आणि विरोधी गटातील मोठा गट किंवा पक्ष असेल तर विरोधी पक्षनेता अशी दोनच वैधानिक पदे होती. परंतु महापालिकेच्या अधिनियमात एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के सदस्य असतील तर गटनेता नियुक्त करता येऊ शकतो, असे निमित्त करून अनेक गटनेते पुढे नेमण्यात आले. त्यानंतर आता गेल्या काही वर्षांत सत्तारूढ आणि विरोधी पक्षातील एकाला अधिक पदाची संधी मिळावी यासाठी सभागृह नेत्याबरोबरच सत्तारूढ पक्षाचा तसेच विरोधी पक्षातील मोठ्या पक्षाच्या विरोधी पक्ष नेत्याबरोबरच त्यांचाही एक गटनेता नियुक्त करण्याची पद्धत सुरू केली. परंतु राजकीय सोयीच्या नियमात ती वैध कशी ठरणार असा प्रश्न आहे. महापालिकेने बससेवा सुरू करण्यासाठी कंपनी स्थापन करण्याचा ठराव केला. त्यात महापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेता, सत्तारूढ पक्षाचा गटनेता आणि विरोधी पक्षनेता तसेच विरोधी पक्षाचा गटनेता यांना संचालकपद दिले आहे, परंतु दोन पदे वैधानिक नसल्याने भविष्यात अडचण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नाशिक मनपाची बस कंपनी अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 1:06 AM
महापालिकेच्या वतीने बससेवा सुरू करण्यासाठी कंपनी सुरू करण्याची प्रकिया होत असताना दुसरीकडे मात्र अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कंपनीत सत्तारूढ आणि विरोधी पक्षांचा गटनेता ही दोन पदे संचालक म्हणून नियुक्त करण्यात आली असली तरी या दोन्ही पदांचा कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्देदोन गटनेत्यांबाबत वाद : वैधानिक पद नसल्याने पेच