नाशिक : तुमच्या घराच्या बाजूला ड्रेनेज तुंबलेय...तुम्हाला पाणीपट्टी, घरपट्टी भरायचीय...तुमच्या चौकात अतिक्रमण झालेय की नळाला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फूटली आहे....या सर्व तक्रारी नाशिक महानगरपालिकेच्या सोशल मिडिया हँडलवर करण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आजमितिला फेसबूकचे ६२ हजार, ट्विटरचे १३,२९८ तर इन्स्टाग्रामचे १२ हजार असे सुमारे ८७ हजार फॉलोअर्स आहेत.
नाशिक महापालिकेच्या विविध सेवा, उपक्रम, कार्यक्रम, योजना, प्रकल्प इत्यादींची माहिती तसेच अपडेट जाणून घेण्यासाठी कोरोनाच्या काळात वेगवेगळी सोशल मिडिया हँडल्स तयार करण्यात आली होती. त्यानंतर आजतायागत हजारो नाशिककर सोशल मिडियाशी जोडले गेले आहेत. आजच्या काळात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आजकाल तर आठवी नववीच्या मुलां-मुलींपासून ते वृद्ध लोकांपर्यंत सोशल मीडिया म्हणजेच फेसबूक, व्हॉटसअप, टि्वटर,इन्स्टाग्राम , स्नॅपचॅट,लिंकडिन, यू ट्यूब इत्यादीचा वापर फोटो टाकण्यासाठी, लाईक्ससाठी, जॉब्ससाठी, कनेक्ट राहण्यासाठी केला जातो.
स्वतंत्र टिममहापालिकेच्या सोशल मिडिया टिममध्ये पाच जणांचा समावेश करण्यात आला आहे. या टिमचे प्रतिनिधीत्व पर्यावरण उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे, माहिती व संचलनालय विभागाचे नितीन धामणे करतात. टिममधील मेंबर व्हिडिओ इडिटींग, क्रिएटिव्ह वर्क तयार करते. याशिवाय विविध विभागातील माहिती जाणून घेत संबधित खातेप्रमुखांना अनॅलिटिकल रिपोर्ट तयार करून देते.
पुष्पोत्सवात १० लाख नागरिकांपर्यंत पोहोचवली माहितीउद्यान विभागाच्यावतीने काही दिवसांपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या पुष्पोत्सवाची माहिती सोशल मिडियाच्या हँडलर्सकडून तब्बल १० लाख नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली. यात सर्व प्रसिद्धी डिजिटल स्क्रीन असो की होर्डिंग यापासून करण्यात आली. त्याला उस्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. विशेष म्हणजे सोशल मिडिया इन्फ्लूअर्स म्हणून १२ ते १३ जणांच्या टिमने यात भरीव कामगिरी केली.
या आहेत ई सेवामालमत्ता कर, पाणी कर, नागरी सेवा, तक्रार, उत्सव मंडप परवानगी, ई-निविदा, कालिदास कलामंदिर थिएटर बुकींग, इमारत प्लॅन, गोदावरी संवर्धन कक्ष, एनएमसी जीआयएस, उद्यान या विभागांना प्राधान्य देण्यात आले आहे.
महत्वाचे क्रमांकआग, रूग्णालये, २४ तास औषध विक्रेता, रूग्णवाहिका, प्रशासकीय, कचरा वाहतुक, महापालिका तक्रार हेल्पलाईन याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
महत्वाची माहितीमाहिती अधिकार, स्थानिक संस्था कर विभाग, समाज कल्याण विभाग, राष्ट्रीय फेरीवाला धोरण, कार्याशाळा व्यावस्थापन विभाग,पाणी पुरवठा व मलनि:सारण यांत्रिकी विभाग, मिळकत विभाग, माहिती तंत्रज्ञान विभाग, गुणनियंत्रण विभाग, सार्व. आरोग्य अभियांत्रिकी विभाछपाई विभाग, मध्यवर्ती भांडार विभाग, नोंदणी व बटावडा विभाग, जाहिरात व परवाने विभाग, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान विभाग, स्थानिक संस्था कर विभाग, सेवाप्रवेश नियम, शहर बस सेवा, पदोन्नती माहिती याबद्दल स्वतंत्र लिंक्स तयार करण्यात आली आहे.
असे आहेत फॉलोअर्सफेसबूक : ६२ हजारट्विटरचे : १३,२९८इन्स्टाग्राम : १२ हजारएकूण : ८७ हजार फॉलोअर्स