नाशिक- शहरात मंजुर अभिन्यास आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी देय असलेल्या सदनिकांची माहिती म्हाडाला वेळेत न दिल्याचे प्रकरण महापालिकेचे प्रशासककैलास जाधव यांना भोवले असून त्यांची विधी मंडळातील चर्चेनंतर मंगळवारी (दि.२३) तडकाफडकी बदली करून बृहन मुंबई महापालिकेचे सह आयुक्त रमेश पवारयांची नियुक्ती करण्यात आली आहे.विधान परीषदेत सोमवारी (दि.२१) विरोधी पक्ष नेता प्रविण दरेकर यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले होतेे.
त्यावर उत्तर देताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याची माहिती दिली होती तर आमदार कपील पाटील यांनी या प्रकरणात सातशे कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचा दावा केला होता. त्यानंतर विधान परीषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी महापालिका आयुक्त (प्रशासक) कैलास जाधव यांना हटवण्याचे निर्देश सरकारला दिले हेाते. त्यानंतर मंगळवारी त्यावर नगरविकास खात्याने तडकाफडकी कार्यवाही करीत नाशिक महापालिकच्या आयुक्तपदी बृहनमुंबई महापालिकेचे आयुक्त रमेश पवार यांची नियुक्ती केली आहे.
नाशिक शहरात २०१३ पासून आत्तापर्यंत एक एकर क्षेत्रापेक्षा अधिक किती अभिन्यास मंजुर झाले आणि म्हाडा कडे आर्थिक दुर्बल घटकांसाठी किती घरेदेण्यात आली याची माहिती नोव्हेंबर महिन्यात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नोव्हेंबर महिन्यात मागितली होती. मात्र कोरोना काळामुळे तीवेळेत देता आली नसल्याचे कैलास जाधव यांचे म्हणणे होते. त्यावरून आव्हाड यांनी नाशिक महापालिकेची यासंदर्भात चौकशी करणार असल्याचे सांगितले होते.
महापाालिकेच्या म्हणण्यानुसार ५२ तात्पुरते तर ३० अंतिम अभिन्यास मंजुर करण्या्त आले आहेत. १५७ सदनिका म्हाडाकडे हस्तांतरीत करण्यात आल्या आहेत.तर ४ हजार ३०० सदनिका निर्माणाधिन असून त्या लवकरच म्हाडाकडे हस्तांतरीत करण्यात येणार असून या प्रकरणात कोणत्याही प्रकारची अनियमीता झालानसल्याचा दावा महापालिकेने केला आहे. त्यामुळे प्रशासक कैलास जाधव यांच्या बदलीचे नक्की कारण काय तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे तसेचगृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यातील वादाचा हा परीणाम आहे काय असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.