नाशिक : पाणी पुरवठ्याच्या समस्येवर बोलू देत नाही म्हणून संतप्त झालेल्या शिवसेना नगरसेवकाने सभागृहात आणलेले मटके फोडले त्याचा एक तुकडा भाजप नगरसेविकेला लागल्याने आज एकच गोंधळ उडाला. या मुळे भाजपा सेनेच्या महासभेत तुंबळ वाकयुद्ध झाले गोंधळामुळे महापौर रंजना भानसी यांनी पंधरा मिनिटे कामकाज तहकूब केले.नाशिक महापालिकेची महासभा आज रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाले यावेळी नाशिकरोड येथील जयभवानी रोडवर पाणी पुरवठा होत नसल्याने शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक सुनील गोडसे यांनी विशेष बॅनर परिधान करून बरोबर रिकामे मटके घेऊन आले होते त्यांना महापौर भानसी यांनी बोलू दिल नसल्याने त्यांनी सभागृहाच्या मध्यभागी मटके फोडले त्यामुळे सभागृहात गोंधळ उडाला सुनील गोडसे यांना बोलू द्या अशी मागणी शिवसैनिकांनी आक्रमक पणे केली. त्याचवेळी भाजपच्या नगरसेविका वर्षा भालेराव यांच्या डोक्याला उडालेला तुकडा लागल्याने भाजपाच्या महिला नगरसेवकांनी एकच गोंधळ घातला. शिवसेनेच्या नगरसेवकांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण गोंधळ वाढला त्यामुळे भानसी यांनी 15 मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले.दरम्यान सभा तहकूब झाल्यानंतर देखील दोन्ही पक्षात गोंधळ झाला भाजपा नगरसेवक यांनी गोडसे यांनी माफी मागावी तसेच त्यांना सभागृहातून बडतर्फ करा अशी घोषणा सुरू केल्या आहेत
नाशिक महापालिका : महासभेत मडकी फोडल्याने उडाला गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 1:43 PM
शिवसेनेच्या नगरसेवकांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण गोंधळ वाढला त्यामुळे भानसी यांनी 15 मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले.
ठळक मुद्देभाजपा सेनेच्या महासभेत तुंबळ वाकयुद्ध झाले महापौर रंजना भानसी यांनी पंधरा मिनिटे कामकाज तहकूब केले.सुनील गोडसे यांनी सभागृहाच्या मध्यभागी मडके फोडले