नाशिक : सप्टेंबरच्या दुस-या आठवड्यापासून गायब झालेल्या पावसामुळे यंदा जिल्ह्यात ८२ टक्केच पाऊस झाल्याने धरणांमध्ये ७८ टक्केच जलसाठा होऊ शकला आहे. अशातच पाच तालुक्यांमध्ये आॅक्टोबर महिन्यातच तीव्र टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झालेली असल्यामुळे जिल्ह्यातील धरणाच्या पाण्यावर असलेले विविध आरक्षणांचा विचार करता, यंदा पाणी आरक्षण करताना प्रशासनाची दमछाक होणार असल्याचे चित्र दिसत असताना नाशिक महापालिकेने मात्र गंगापूर व दारणा धरणातून गत वेळपेक्षाही अतिरिक्त पाण्याची मागणी नोंदविली आहे.यंदा पावसाळा समाधानकारक असेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला, परंतु त्या उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. जुलैत उशिरा आगमन झालेल्या पावसामुळे पीक पेरणी शंभर टक्के झाली असली तरी, थेट आॅगस्टमध्येच हजेरी लावलेल्या पावसाने पिके काही प्रमाणात तगण्यास मदत झाली त्याचप्रमाणे जुलै व आॅगस्टच्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊन हातभार लागला. साधारणत: गंगापूर व दारणा धरण क्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यातील पावसामुळे या दोन्ही धरणांमध्ये शंभर टक्के जलसाठा होऊ शकला, मात्र जिल्ह्यातील अन्य धरणांमध्ये यंदा ७८ टक्केच पाणी साठले आहे. आॅक्टोबर महिना सुरू झाल्याने आता परतीच्या पावसाची अपेक्षा संपुष्टात आली असून, पाऊस पडला तरी त्यातून धरणांच्या साठ्यात वाढ होण्याची शक्यता तशी कमीच आहे. अशा परिस्थितीत १५ आॅक्टोबर पूर्वी जिल्ह्यातील धरणातील पाण्याचे आरक्षण जाहीर करणे जिल्हा प्रशासनाला आवश्यक असून, त्या पार्श्वभूमीवर ५ आॅक्टोबर रोजी बोलविलेली पूर्र्वतयारीची बैठक मुख्यमंत्र्यांच्या दौ-यामुळे होऊ शकली नाही. मात्र ज्या ज्या संस्था, पाणीपुरवठा योजना, नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद यांना धरणाच्या पाण्याची आवश्यकता आहे त्यांच्याकडून पाणी मागणी अहवाल मागविण्यात आला आहे. त्यात नाशिक महापालिकेने गंगापूर धरणातून ५४०० दशलक्ष घनफूट व दारणा धरणातून ८०० दशलक्ष घनफूट असे एकूण ६२०० दशलक्ष घनफूट पाणी मिळावे, अशी मागणी केली आहे. यंदा पर्जन्यमान कमी झालेले असून, जिल्ह्यात आत्तापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. अशा परिस्थितीत गेल्या वर्षी ज्या पाणीपुरवठा योजनांसाठी धरणातून पाणी आरक्षित ठेवण्यात आले होते. त्यांनीदेखील वाढीव मागणी करण्यास सुरुवात केल्याने धरणाचे पाणी यंदा चांगलेच पेटण्याची परिस्थिती दिसू लागली आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाची कसोटी लागणार आहे.
नाशिक महापालिकेला हवे गंगापूरमधून अतिरिक्त पाणी
By श्याम बागुल | Published: October 09, 2018 3:17 PM
यंदा पावसाळा समाधानकारक असेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला, परंतु त्या उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. जुलैत उशिरा आगमन झालेल्या पावसामुळे पीक पेरणी शंभर टक्के झाली असली तरी, थेट आॅगस्टमध्येच हजेरी लावलेल्या पावसाने
ठळक मुद्देदारणावरही हक्क : अपुऱ्या जलसाठ्याने आरक्षण धोक्यात एकूण ६२०० दशलक्ष घनफूट पाणी मिळावे, अशी मागणी