नाशिक : मराठी शाळा चालविणाऱ्या महापालिकेने आता थेट केंद्रीय बोर्डाची सीबीएसई संचलित शाळा करण्याची तयारी सुरू केली असून, पीपीपी म्हणजे भागीदारीतून ती साकारण्यात येणार आहे. अर्थात त्यावर मतभिन्नता असून, एकीकडे महापालिका आपल्या पाच इंग्रजी शाळा बंद करण्याच्या तयारीत असताना हा नवीन घाट कशासाठी? असाही प्रश्न केला जात आहे.महापालिकेच्या एकूण १२८ प्राथमिक शाळा होत्या. मात्र त्यातील कमी पटसंख्येच्या शाळा एकत्र करून त्या आता ९० करण्यात आल्या आहेत या शाळांमध्ये सध्या सुमारे तीस हजार विद्यार्थी शिकत आहेत. मात्र आता महापालिका सीबीएसई बोर्डाची शाळा सुरू करण्याच्या तयारीत असून, खासगीकरणातून हा प्रकल्प साकारण्याचा प्रशासनाचा मानस असल्याने शहरवासीयांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेषत: महापालिकेने खासगीकरणातून पीपीपी तत्त्वावर शाळा सुरू करण्याची तयारी केली असून, संबंधित भागीदाराशी महापालिका कशी आणि काय करार करते या विषयी उत्सुकता आहे. चालू शैक्षणिक वर्षात अनेक खासगी शाळांची मुले महापालिकेच्या शाळेत दाखल झाल्याचा महापालिका शिक्षण विभागाचा दावा आहे. त्यामुळे महापालिका हे धाडस करीत असली तरी प्रत्यक्षात अशाप्रकारची शाळा सुरू होईल काय आणि महापालिकेच्या शाळांमध्ये येणाºया वर्र्गातील मुलांना त्याठिकाणी प्रवेश मिळेल काय? अशा अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत.विशेष म्हणजे महापालिकेच्या वतीने पाच इंग्रजी माध्यमांच्या शाळा चालविल्या जातात. इंग्रजी माध्यमाची प्रथम बालवाडी सुरू केल्यानंतर त्याला मिळणारा प्रतिसाद बघता महापालिकेने उत्साहाने आणखी काही ठिकाणी वर्ग सुरू केले. त्यातील अनेक ठिकाणी वर्ग बंद झाले असून, आता फक्त पाच ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू आहेत. त्याही पाचवीपर्यंतच आहेत. तथापि, त्यात शिक्षक टिकवणे आणि अन्य समस्या असल्याची जाणीव शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी नितीन उपासनी यांना झाल्याने त्यांनी या शाळा बंद करण्याची आणि मुलांना महापालिकेच्याच शाळांमध्ये सेमीत प्रवेश देण्याची तयारी दर्शविली असून, त्यांनी आयुक्तांना प्रस्ताव सादर केला आहे. असे असताना आता खासगीकरणातून सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये प्रवेशाचे शिवधनुष्य महापालिकेला कितपत पेलवेल याविषयी शंका निर्माण झाली आहे.मराठी शाळांचे काय?महापालिकेच्या शाळांना गळती लागल्याने १२८ वरून अनेक शाळांचे एकत्रीकरण करून आता ९० शाळा ठेवण्यात आल्या आहेत. एकीकडे अशी अवस्था असताना दुसरीकडे सीबीएसईचे धाडस कसे पेलवेल? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नाशिक मनपा आता सीबीएसई स्कूल सुरू करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 12:19 AM
मराठी शाळा चालविणाऱ्या महापालिकेने आता थेट केंद्रीय बोर्डाची सीबीएसई संचलित शाळा करण्याची तयारी सुरू केली असून, पीपीपी म्हणजे भागीदारीतून ती साकारण्यात येणार आहे. अर्थात त्यावर मतभिन्नता असून, एकीकडे महापालिका आपल्या पाच इंग्रजी शाळा बंद करण्याच्या तयारीत असताना हा नवीन घाट कशासाठी? असाही प्रश्न केला जात आहे.
ठळक मुद्देभागीदारी : लवकरच शासनाला प्रस्ताव सादर करणार