नाशिक : गेल्यावर्षी करवाढ रद्द करण्याचे महासभेत तीन वेळा ठरवून देखील त्याची अंमलबजावणी आयुक्त करीत नसल्याने त्यासंदर्भात विरोधी पक्ष नेत्यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला महापौरांनी बगल दिली. आणि कामकाज पुढे रेटण्याच प्रयत्न केला. त्यामुळे शुक्रवारी (दि. २२) झालेल्या महासभेत विरोधकांनी जाब विचारून गोंधळ घातला. हेच निमित्त करून महापौर रंजना भानसी यांनी क्षणार्थात सर्व विषय मंजुर करून महासभा गुंडाळली. यानंतर संतप्त झालेल्या विरोधकांनी घोषणाबाजी करून सभागृह दणाणून सोडले. नगरसचिवांनी देखील पलायन केल्याने विरोधकांनी त्यांच्या दालनात जाऊन त्यांची खूर्ची उलटी करून त्यावर निषेधाचा मजकुर चिटकवला.पुलवामा येथील दहशतवादी हल्याच्या निषेधार्थ गेल्या बुधवारी (दि.२०) महासभा विरोधकांच्या आग्रहमुळेच महापौर भानसी यांनी तहकुब केली होती. त्यामुळे करवाढ रद्दच्या ठरावाची अंमलबजावणी आयुक्त का करीत नाहीत याचा जाब विचारण्यासाठी दिलेल्या लक्षवेधीवर शुक्रवारी (दि. २२) आयोजित महासभेत चर्चा होणे अपेक्षीत होते. परंतु सभागृहाचे कामकाज सुरू होताच महापौरांनी सर्व प्रथम श्रध्दांजलीच्या प्रस्तावाचे वाचन केले. त्यानंतर अभिनंदनाचे प्रस्ताव देखील पारीत झाल्यानंतर महापौर रंजना भानसी यांनी विषय पत्रिकेवरील नियमीत विषय घेण्यास सुरूवात केली. त्यामुळे विरोधी पक्ष नेता अजय बोरस्ते आणि शिवसेना गटनेता विलास शिंदे यांनी त्यांना रोखले. बोरस्ते यांनी लक्षवेधीबाबत विचारल्यानंतर महापौरांनी लक्षवेधी दाखल नसल्याचे सांगितल्याने सर्वच विरोधी पक्ष संतप्त झाले आणि पीठासनासमोर जमा झाले. करवाढ रद्दच्या विषयावर चर्चा झालीच पाहिजे असे त्यांनी म्हणून बघितले परंतु महापौरांनी ऐकले नाही त्यामुळे विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. महासभेच्या आधी नियमानुसार तीन दिवस अगोदर लक्षवेधी सादर करून देखील ती दाखल का करून घेतली नाही म्हणून नगरसचिवांना जाब विचारला दरम्यान महापौरांनी वाढता गोंधळ घेऊन तातडीने विषय पत्रिकेवरील विषय क्रमांक ३२४ ( फेरीवाला उपविधी ठरवणे) वगळता सर्व विषय तातडीने मंजुर करून सभेचे कामकाज संपवले आणि राष्टÑगीत सुरू केले.
नाशिक महापालिकेच्या महासभेत करवाढीच्या मुद्यावरून पुन्हा गदारोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 3:25 PM
महासभेच्या आधी नियमानुसार तीन दिवस अगोदर लक्षवेधी सादर करून देखील ती दाखल का करून घेतली नाही म्हणून नगरसचिवांना जाब विचारला दरम्यान महापौरांनी वाढता गोंधळ घेऊन तातडीने विषय पत्रिकेवरील विषय क्रमांक ३२४ ( फेरीवाला उपविधी ठरवणे) वगळता सर्व विषय तातडीने मंजुर करून सभेचे कामकाज संपवले आणि राष्टÑगीत सुरू केले.
ठळक मुद्देमहापौरांनी गुंडाळले कामकाज नगरसचिवाचे पलायन, खुर्ची उलटी करून चिटकवले निवेदन