नाशिक (सुयोग जोशी) : महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरिता ‘उत्कृष्ठ शिक्षक’ पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. या पुरस्कारांचे वितरण ९ सप्टेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाधिकारी बी. टी. पाटील यांनी दिली.
मनपा प्राथमिक शाळा मराठी माध्यमातील वैशाली क्षीरसागर (शाळा क्र. ७०, तोरणानगर), श्रीकृष्ण वैद्य (शाळा क्र. ५९, वडनेर दुमाला), जयश्री मराठे (शाळा क्र. ७७, अंबड), दत्तात्रय शिंपी (शाळा क्र. २८, सातपूर कॉलनी), किरण वाघमारे (शाळा क्र. ४९, पंचक, जेलरोड), रोहिणी मंडळ (शाळा क्र. ११, मखमलाबाद नाका), अनंत शिंपी (शाळा क्र. १३), सविता बोरसे (शाळा क्र. २१), श्रृती हिंगे (शाळा क्र. ८२), मनपा प्राथमिळ शाळा उर्दू माध्यमातील काझी जहाआरा मोईनुद्दीन ( शाळा क्र. ३१), मनपा माध्यमिक विभागातील राजेंद्र सोनार (मुख्याध्यापक, शिवाजीनगर, सातपूर), बाळासाहेब आरोटे (मनपा माध्यमिक शाळा, अंबड), खासगी प्राथमिक शाळेच्या ज्योती खंडेराव फड (नूतन मराठी प्राथमि शाळा), किरण गणेश शिरसाठ (पाटील प्राथमिक विद्यालय), मंगला दीपक पवार (केंद्रप्रमुख, केंद्र क्रमांक ७) यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कारासाठी ३० ते ३५ प्रस्ताव आले होते. पुरस्काराची निवड करण्यासाठी निवड समितीचे अध्यक्ष तथा आयुक्त डॉ. अशोक करंजकर, उपाध्यक्ष प्रदीप चौधरी, अतिरिक्त आयुक्त पंडित साेनवणे, मनीषा देवरे, बी.टी. पाटील यांनी काम पाहिले.