नाशिक : मतदार पुर्नरिक्षण मोहिमेंसाठी जिल्हा प्रशासनाने बोलविलेल्या बैठकांना अनुपस्थित राहण्याबरोबरच बीएलओंना नियुक्तीचे आदेश न बजावणे, निवडणुकीच्या कामाकडे दुर्लक्ष करणे अशा विविध कारणास्तव महापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी दिलेला खुलासा अमान्य करून निवडणूक अधिकाºयांनी आता नाशिक शहरातील मतदार यादीच्या पुर्नरिक्षणाचे कामाचे समन्वयक म्हणून उपासनी यांच्यावरच जबाबदारी निश्चित केली असून, बीएलओेंकडून काम करून घेण्याकडे दुर्लक्ष न करण्याची ताकीद दिली आहे.भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये मतदार पुर्नरिक्षण मोहिम सुरू करण्यात आली असून, नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदार संघातील मतदार केंद्र निहाय बीएलओंची नेमणूक करण्यात आली आहे. शहरी भागात नेमलेल्या बीएलओंमध्ये नाशिक महापालिकेच्या शाळेतील व काही खासगी अनुदानीत शाळेच्या शिक्षकांची नेमणूक करण्यात आली असून, महापालिकेच्या शिक्षकांच्या नेमणुकीचे आदेश निवडणूक अधिका-यांनी महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडे बजाविण्यासाठी सोपविले होते. परंतु शिक्षण मंडळाने शिक्षकांना नियुक्तीचे आदेश बजावले नाहीत, त्या संदर्भात आढावा घेण्यासाठी निवडणूक अधिका-यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलविलेल्या दोन बैठकांना शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी दांडी मारली. शिक्षकांना नेमणूक आदेश न मिळाल्यामुळे नाशिक शहरात मतदार पुर्नरिक्षण कार्यक्रम राबू शकला नाही. यासा-या बाबी लक्षात घेऊन तीन दिवसांपुर्वी निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉ. शशीकांत मंगरूळे यांनी नितीन उपासनी यांना नोटीस बजावून चोवीस तासाच्या आत समक्ष उपस्थित राहून खुलासा करण्याचे आदेश दिले होते.नोटीसीप्रमाणे उपासनी यांनी गुरूवारी आपला लेखी खुलासा समक्ष निवडणूक अधिका-यांकडे सादर केला व त्यात आपल्यावरील सारे आरोप त्यांनी फेटाळून निवडणूक कामात हलगर्जीपणा न केल्याचा खुलासा केला होता. डॉ. मंगरूळे यांनी हा खुलासा नाकारला असून, उलट त्यांना दुसरी नोटीस बजावून मोहिम पुर्ण होईपर्यंत नाशिक शहरातील बीएलओंसाठी समन्वयक म्हणून काम करण्याची जबाबदारी निश्चित केली आहे. बीएलओंकडून काम पुर्ण करून घेण्याची काम उपासनी यांनी करावे तसेच या कामाकडे दुर्लक्ष करू नये अशी सक्त ताकीदच त्यांना दिली आहे. मतदार पुर्नरिक्षण मोहिम पुर्ण करण्याची मुदत १५ डिसेंबर असून, त्यामानाने शहरात बीएलओंनी अद्याप कामालाही सुरूवात केलेली नसल्याने उपासनी यांची कसोटी लागणार आहे.
नाशिक मनपा प्रशासनाधिका-यांना निवडणूक शाखेची सक्त ताकीद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 6:55 PM
भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये मतदार पुर्नरिक्षण मोहिम सुरू करण्यात आली असून, नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदार संघातील मतदार केंद्र निहाय बीएलओंची नेमणूक करण्यात आली आहे. शहरी भागात नेमलेल्या बीएलओंमध्ये नाशिक महापालिकेच्या शाळेतील व काही खासगी अनुदानीत शाळेच्या शिक्षकांची नेमणूक करण्यात आली
ठळक मुद्देबीएलओंची जबाबदारी निश्चित : दुर्लक्ष केल्यास कारवाईचा इशाराशिक्षण मंडळाने शिक्षकांना नियुक्तीचे आदेश बजावले नाहीत