नाशिक - महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीची प्रशासनाकडून सातत्याने होणारी उपेक्षा, कामांना लागणारा विलंब आणि नेहमीच दुय्यम लेखले जात असल्याची कैफीयत मांडत समितीच्या सदस्यांनी सभागृहातच ठिय्या मांडत संताप व्यक्त केला. अधिका-यांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याबद्दलही प्रशासनाचा निषेध करण्यात आला आणि सामूहिक राजीनाम्याचा इशारा देण्यात आला.महिला व बालकल्याण समितीची मासिक सभा सभापती सरोज अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. मात्र, सभेला कामगार कल्याण अधिकारी ए.पी. वाघ, वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजेंद्र भंडारी वगळता एकही खात्याचा प्रमुख अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे संतप्त झालेल्या सदस्यांनी सभागृहात सभापतींच्या समोर जागेत ठिय्या मांडला आणि संताप व्यक्त करत प्रशासनाचा निषेध केला. यामध्ये उपसभापती कावेरी घुगे यांच्यासह सत्यभामा गाडेकर, शीतल माळोदे, नयना गांगुर्डे, समीना मेमन, भाग्यश्री ढोमसे, प्रियंका घाटे, पूनम मोगरे यांचा समावेश होता. सभापती सरोज अहिरे यांनीही प्रशासनाच्या नाकर्त्या भूमिकेबाबत हतबलता व्यक्त करत राजीनामा देण्याचा इशारा दिला. महिला बालकल्याण समितीच्या सभांमध्ये नुसते ठराव केले जातात प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याची तक्रार यावेळी सदस्यांनी केली. समितीने महिला समुपदेशन केंद्र सहाही विभागात स्थापन करण्याबाबतचा ठराव जून २०१७ मध्ये केला होता परंतु, त्याची अद्याप कार्यवाही झालेली नाही. समितीचा निधी परस्पर अन्य खात्यांकडे वळविला जातो. कामेच होत नसतील तर समितीच बरखास्त करून टाकण्याची मागणी सदस्यांनी केली. सत्यभामा गाडेकर यांनी आम्हाला कठपुतळ्या करू नका आणि रुद्रावतार दाखविण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा दिला. अंगणवाड्यांतील महिला सेविकांच्या आरोग्य तपासणीचा कार्यक्रमही सभापतींना न विचारताच परस्पर घेण्यात आल्याबद्दल सभापतींनी आश्चर्य व्यक्त केले तसेच २६ जानेवारीला बिस्किटांऐवजी मुलांना दफ्तर वाटप करण्याचे ठरले असतानाही त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने सरोज अहिरे यांनी नाराजी व्यक्त केली.उपआयुक्तांचे तासाभराने आगमनसमितीच्या सभेला उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर उपस्थित नव्हते. त्यामुळे सदस्यांनी अगोदर उपआयुक्तांना बोलवा, असा आग्रह धरला. परंतु, पाऊणतास उलटूनही उपआयुक्तांचे आगमन न झाल्याने सदस्यांनी आयुक्तांना बोलविण्याची मागणी केली. त्यानुसार, सभापतींनी आयुक्तांना दूरध्वनीवरून कल्पना दिली असता, आयुक्तांनी उपआयुक्तांना पाठवत असल्याचे सांगितले. त्यानुसार, तासाभराने उपआयुक्त दोरकुळकर यांचे सभागृहात आगमन झाले. त्यानंतर सदस्यांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला.
नाशिक महापालिकेतील महिला बालकल्याण समिती सदस्यांचा सभागृहात ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 6:14 PM
रूद्रावतार : समितीला दुय्यम लेखले जात असल्याची तक्रार
ठळक मुद्देमहिला व बालकल्याण समितीची प्रशासनाकडून सातत्याने उपेक्षामहिला बालकल्याण समितीच्या सभांमध्ये नुसते ठराव केले जातात प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याची तक्रार