नाशिक : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा कहर कायम असताना शुक्रवारी दिलासादायक वृत्त आले आहे. बाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. दरम्यान, शुक्रवारी ४,५९६ नवे बाधित आढळून आले असले तरी, ४,६४८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. काेरोना बळींनी शुक्रवारी (दि.२२) पुन्हा ४९ पर्यंत मजल मारली. त्यामुळे बळींची एकूण संख्या ३,२२६ वर पोहोचली आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने एकूण ४,५९६ पर्यंत मजल मारली आहे.जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये २,१७५, तर नाशिक ग्रामीणला २,२४७ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात १३० व जिल्हाबाह्य ४४ रुग्ण बाधित आहेत, तर जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात १५, ग्रामीणला ३३, मालेगाव मनपात १, असा एकूण ४९ जणांचा बळी गेल्याने आरोग्य यंत्रणा हतबल ठरली आहे. ग्रामीणमधील बळी चिंताजनकn जिल्ह्यात ४९ नागरिकांनी जीव गमावला आहे. सतत इतक्या मोठ्या प्रमाणातील बळींचा आकडा प्रत्येक नाशिककराच्या मनाचा थरकाप उडवणारा ठरत आहे. n आठवडाभरापासून जिल्ह्यातील ग्रामीण भागामधील बळींची संख्या शहरातील बळींच्या तुलनेत सातत्याने अधिक आहे. शुक्रवारीदेखील शहराच्या १५ बळींच्या तुलनेत जवळपास दुप्पटहून अधिक म्हणजे ३३ बळी ग्रामीणमधून गेले आहेत.
नाशकात बाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 1:41 AM
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा कहर कायम असताना शुक्रवारी दिलासादायक वृत्त आले आहे. बाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. दरम्यान, शुक्रवारी ४,५९६ नवे बाधित आढळून आले असले तरी, ४,६४८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
ठळक मुद्देकोरोना : जिल्ह्याला मिळाला दिलासा