नाशिक : नाशिक जिल्हा स्थापनेला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जिल्ह्याची महती आणि महिमा राज्यासमोर मांडण्याच्या अभिनव अशा ‘नाशिक वन फिफ्टी वन’ या महोत्सवाला येत्या १ मेपासून प्रारंभ होणार असून, १ मे २०२१ पर्यंत जिल्ह्याची ओळख विविध उपक्रमांतून अधोरेखित केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘नाशिक १५१’ कार्यक्रम नियोजनाच्या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, नितीन मुंडावरे यांच्यासह जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील जाणकार व मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.
नाशिक १५१ कार्यक्रमांच्या नियोजनासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले की, वर्षभर सुरू राहणाऱ्या या महोत्सवाच्या नियोजनासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली एक मुख्य मध्यवर्ती समिती गठित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पुढील महिन्यात नाशिक येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कालावधीत या महोत्सवात वर्षभर राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रातील सर्व जाणकार व्यक्तींनी एकत्र येऊन नियोजनात सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मांढरे यांनी बैठकीत केले. या महोत्सवासाठी राज्य शासनामार्फत १५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
--इन्फो--
तीन टप्प्यात महोत्सव
अपूर्ण प्रकल्प पूर्ण करणे, कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र सुरू करणे तसेच नाशिक जिल्ह्याची ओळख सांगणारे संगीत, क्रीडा, पर्यटन, शेती, साहित्य अशा विविध क्षेत्रातील महोत्सव साजरे करणे अशा तीन टप्प्यांत महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्याचा इतिहास त्याचप्रमाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातील अनेकविध कला, संस्कृती, शेती, उद्योग, चित्रपट, संगीत, लोककला यांना एक व्यासपीठ मिळण्याच्या उद्देशाने नावीन्यपूर्ण कल्पना या बैठकीत मांडण्यात आल्या आहेत.
===Photopath===
150221\15nsk_57_15022021_13.jpg
===Caption===
जिल्हाधिकारी सूरज मांढरे