शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

Nashik Oxygen Leak: 'गेल्या 2 महिन्यांतील आठवी घटना, मृतांच्या नातेवाईकांना भरीव मदत द्या'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 3:54 PM

Nashik Oxygen Leak: दुर्घटनेच्या तब्बल २ तासानंतर नाशिक महापालिका आयुक्तांनी रुग्णालयस्थळी भेट दिली. ऑक्सिजन गळती प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही

ठळक मुद्देनाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात घडलेली घटना प्रचंड धक्का देणारी आणि ह्रदयद्रावक आहे. ऑक्सिजन टाकीला गळती लागून आत्तापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन महिन्यांतील ही आठवी घटना आहे.

नाशिक - एकीकडे राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा असताना दुसरीकडे नाशिकमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या टाकीला दुपारी १२ च्या सुमारास मोठ्या प्रमाणात गळती सुरु झाली. या ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेत तब्बल २२ रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे. या घटनेनंतर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना शोक व्यक्त केला. तर, चंद्रकांत पाटील यांनीही ही घटना धक्कादायक असल्याचं म्हटलंय. 

दुर्घटनेच्या तब्बल २ तासानंतर नाशिक महापालिका आयुक्तांनी रुग्णालयस्थळी भेट दिली. ऑक्सिजन गळती प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. १० ते ११ रुग्ण मृत्यू पडल्याची शक्यता असल्याचं महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितलं. सध्या, हॉस्पिटलमध्ये साधारणपणे १५० रुग्ण आहेत. ऑक्सिजन गळती होत असल्याने रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा हळूहळू संपत चालला आहे. त्यामुळे आणखी रुग्ण दगावण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेच्या सखोल चौकशीची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. तसेच, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही चौकशीची मागणी केली आहे.

नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात घडलेली घटना प्रचंड धक्का देणारी आणि ह्रदयद्रावक आहे. ऑक्सिजन टाकीला गळती लागून आत्तापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन महिन्यांतील ही आठवी घटना आहे. कुठं शॉर्ट सर्कीट होतं, कुठं लहान मुलांच्या हॉस्पीटलमध्ये मुलं दगावतात. तातडीने या घटनेची चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे. रुग्णालयातील इतर रुग्णांच्या शिफ्टींगचं काम सुरक्षितपणे व्हायला हवं. तसेच, मृतांच्या नातेवाईकांना भरीव मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. 

देवेंद्र फडणवीसांची मागणी

नाशिकमधील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. नाशिकमध्ये जे घडले ते भयंकर आहे. या दुर्घटनेत 11 लोक मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती असून हे अतिशय वेदनादायी आहे. सद्यस्थितीत रुग्णालयातील इतर रुग्णांच्या मदतीसाठी प्राधान्य देण्यात याावे, गरज पडल्यास त्यांना इतरत्र हलवावे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच, या दुर्घटनेच्या सखोल चौकशीची मागणीही फडणवीस यांनी केली आहे. 

महापालिकेचे कोविड रुग्णालय

ऑक्सिजन गळती रोखण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. या दुर्घटनेत १०-११ रुग्णांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असली तरी आणखी रुग्ण दगावण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ऑक्सिजन नसल्याने रुग्णांची प्रकृती खालावत चालली आहे. महापालिकेचे हे संपूर्ण कोविड रुग्णालय आहे. अनेक रुग्ण ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटरवर आहेत. ऑक्सिजन टाकीला गळती लागल्याने अशा रुग्णांचा जीव धोक्यात आला असून त्यांना अन्य ऑक्सिजन असलेल्या रुग्णालयात स्थलांतरीत  करण्यात येत आहे. 

20 दिवसांपूर्वीच बसवली होती टाकी

नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून तातडीने १५ जम्बो ऑक्सिजन सिलिंडर रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी झाकीर हुसेन रूग्णालयात पाठविण्यात येत आहे. १० के एलची टाकी आहे. १५-२० दिवसांपूर्वीच ही टाकी बसविली होती. नाशिक महापालिकेने न्यू बिटको आणि झाकीर हुसेन रुग्णालयात ठेकेदारामार्फत भाड्याच्या टाक्या बसविल्या आहेत.  

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलNashik Oxygen Leakageनाशिक ऑक्सिजन गळतीNashikनाशिकhospitalहॉस्पिटलDeathमृत्यूBJPभाजपा