नाशिक - राज्यात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा असताना दुसरीकडे नाशिकमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या टाकीला दुपारी १२ च्या सुमारास मोठ्या प्रमाणात गळती सुरु झाली. या ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेत 22 रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली. या घटनेनंतर देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनीही शोक व्यक्त केला आहे.
नाशिकमधील घटनेची राज्य सरकारने दखल घेत, सदर घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच, यासाठी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. तर, मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाख आणि महानगरपालिकेडून 5 लाख अशी एकूण 10 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. दरम्यान, मृत 22 जणांमध्ये 12 पुरुष असून 10 महिलांचा समावेश आहे.
ऑक्सिजन टाकीतील गळतीच्या दुर्घटनेतील 22 मृतांची नावे
१) पंढरीनाथ नेरकर (३७), २) भैय्या सांडुभाई सय्यद (४५)३) अमरदीप नगराळे (७४)४) भारती निकम (४४)
५) श्रावण पाटील (६७)६) मोहना खैरनार (६०
७) मंशी शहा (३६)८) सुनील झाल्टे (३३)
९) सलमा शेख (५९)१०)आशा शर्मा (४५)
११) प्रमोद वालुकर (४५)१२) प्रवीण महाले (३४)
१३) सुगंधाबाई थोरात (६५)१४) हरणाबाई त्रिभुवन (६५)
१५) रजनी काळे (६१),१६) गिता वाघचौरे (५०)
१७) बापुसाहेब घोटेकर (६१)१८) वत्सलाबाई सुर्यवंशी (७०)
१९) नारायण इरनक (७३)२०) संदीप लोखंडे (३७)
२१) बुधा गोतरणे (६९)२२) वैशाली राऊत (४६)
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करुन शोक व्यक्त केला.