नाशिक- नाशिक महापालिकेच्या डॉ झाकीर हुसेन रुग्णालयात गेल्या महिन्यात झालेल्या दुर्घटनेला जबाबदार कोण यासह विविध प्रश्नांची उत्तरे मिळावीत यासाठी आज झालेल्या ऑनलाइन सभेप्रसंगी शिवसेना नगरसेवक संतोष गायकवाड यांनी फलक घेऊन घोषणाबाजी केली. (Who is responsible for the oxygen leak accident? Shiv Sena corporator's agitation in Nashik general body meeting)ही ऑनलाइन महासभा महापौर सतीश कुलकर्णी स्थायी समितीच्या दालनातून संचालित करत असल्याने त्या ठिकाणी संतोष गायकवाड यांनी त्याठिकाणी ठिय्या दिला. मात्र सुरक्षा रक्षकांनी त्यांना प्रवेश द्वारावर अडविले. गेल्या 21 एप्रिल रोजी डॉ झाकीर हुसेन रुग्णालयाच्या ऑक्सिजन टाकीच्या पाईप लाईनला गळती झाल्याने 22 रुग्णांचा मृत्यू झाला होता मात्र या दुर्घटनेत अद्याप कोणालाही दोषी ठरविलेले नाही. त्यामुळे या प्रकरणात दोषी कोण असा प्रश्न करीत त्यांनी हे आंदोलन केले.त्याच बरोबर खासगी रुग्णालयातील बिलांत मोठी लूट होत असून त्यात महापालिकेने काय कारवाई केली, असा प्रश्न गायकवाड यांनी केला तसेच महाराष्ट्र नॅचरल गॅस कम्पनीने शहारत सर्वत्र रस्ते खोदून ठेवले असून त्याबाबत काय कारवाई केली असा प्रश्न देखील गायकवाड यांनी उपस्थित केला.
Nashik Oxygen Leakage: ऑक्सिजन गळती दुर्घटनेला जबाबदार कोण? नाशिकच्या महासभेत शिवसेनेच्या नगरसेवकाचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 12:11 PM