ठळक मुद्देदोघा नराधमांवर बलात्काराचा गुन्हा जिल्हाधिका-यांच्या शिक्कामोर्तबसाठी प्रस्ताव वासनेचा बाजार सील करण्याचे संकेत ‘खाकी’च्या क्रूरतेपासून तर बांग्लादेश-भारत सीमेवरून होणा-या मुलींच्या तस्करीचा पर्दाफाश
नाशिक :बांग्लादेशी मुलीची देहविक्रयसाठी खरेदी करणा-या सिन्नरच्या मुसळगावमधील ‘त्या’ कुंटणखान्याची मालकीण संशयित नानी उर्फ मंगल नंदकिशोर गंगावणेसह पीडितेवर बलात्कार करणारा नानीचा नराधम मुलगा विशाल नंदकिशोर गंगावणे व दलाल सोनू नरहरी देशमुख या तीघा संशयित आरोपींच्या ग्रामिण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. पिडित मुलीला देहविक्रयच्या नरकारत ढकलणारी तिची मावशी व दलाल फरार असून या प्रकरणात सिन्नर पोलीसांची भूमिका संशयास्पद असून या संपुर्ण प्रकरणाची सखोल चौकशी पोलीस अधिक्षक कार्यालयाकडून सुरू करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिक्षक संजय दराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वेश्या व्यवसायासाठी मावशीने आपल्या भाचीला बांगलादेशामधून भारत फिरविण्याच्या बहाण्याने आणत नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील मुसळगाव परिसरात चालणा-या कुंटणखाण्याच्या ‘नानी’ला विकले होते. यानंतर पीडित मुलीचा सौदा ‘नानी’ने मुंबईच्या कुंटणखाण्यासाठी केला आणि काही महिने मुंबईला पिडित मुलगी राहिली व तेथून पुन्हा तीला कोलकात्याच्या ‘त्या’ बाजारात देहविक्र यासाठी विकले गेले, असा तीचा संपूर्ण प्रवासातील नरकयातना पिडित मुलीने बुधवारी नाशिकमध्ये येऊन माध्यमांसमोर मांडल्या. यानंतर ग्रामिण पोलीस दलासह अवघ्या राज्याला हादरा बसला. पोलीस अधिक्षक संजय दराडे यांनी याबाबत दखल घेऊन तत्काल उपअधिक्षक विशाल गायकवाड यांना त्वरित तपासचक्रे फिरवून संशयित आरोपींना अटक करण्याचे फर्मान बजावले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक अशोक करपे यांच्या पथकाने सिन्नर येथे जाऊन संशयित नानीचा मुलगा व दलाला बुधवारी मध्यरात्री ताब्यात घेतले व नानीच्या आज सकाळी मुसक्या आवळल्या. या प्रकरणात सिन्नर औद्योगिक वसाहत पोलीसांची भूमिका संशयास्पद असल्याचे पिडित मुलीने दिलेल्या जबाबावरून पुढे आले आहे. सिन्नर पोलिसांनी दहा महिन्यांपुर्वी दखल घेऊन बांग्लादेशी मुलीची खरेदी करणारी ‘नानी’ला खाकीचा हिसका दाखविला असता तर कदाचित ती मुलगी मुंबई येथून पोलिसांना मिळाली असती व तीचा कोलकात्याचा ‘सौदा’ टळला असता; मात्र सिन्नर पोलीस अधिका-यांनी त्यावेळी दुर्लक्ष करत कुंटणखान्याला अभय देण्याचा प्रयत्न के ला गेला आणि संशयाची सुई ‘नानी’वर असतानाही पोलिसांनी त्यावेळी तिला चौकशीसाठी ताब्यातदेखील घेतले नाही. अखेर पिडित मुलीचा मुंबईवरून थेट कोलकाताच्या देहविक्रय बाजारात सौदा झाला आणि त्या ठिकाणी पुन्हा तिच्या वाट्याला वासनेचा बाजार आल्याने ती पिडित अल्पवयीन मुलगी अनेकांच्या वासनेची बळी ठरली.
ग्रामिण पोलिसांनी नानीसह पिडित मुलीची मावशाी संशयित आरोपी माजिदा अब्दुल (पुर्ण नाव माहित नाही) यांच्याविरूध्द अल्पवयीन मुलीला पळवून आणणे, देहविक्रयच्या व्यवसायाला लावणे, पिडितेच्या इच्छेविरुध्द देहविक्रयसाठी प्रवृत्त करणे तसेच पिटा कायद्यानुसार विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दोघा नराधमांवर बलात्काराचा गुन्हा पोलिसांनी पिडित मुलीच्या जबाबावरून नोंदविला आहे. याप्रकरणाचा संपूर्ण तपास दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गायकवाड व स्थानिक ग्रामिण गुन्हे शाखेचे तीन पथक करत आहेत.
मुसळगावमधील वासनेचा बाजार होणार ‘सील’बांग्लादेशमधील अल्पयीन मुलीच्या खरेदी-विक्री प्रकरणानंतर पुन्हा प्रकाशझोतात आलेला नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील मुसळगाव औद्योगिक वसाहतीमधील वासनेचा बाजार सील करण्याचे संकेत पोलीस अधिक्षक संजय दराडे यांनी पत्रकार परिषदेत दिले. पिटा कायद्यानुसार तसा प्रस्ताव पोलिसांनी तयार केला असून जिल्हाधिका-यांच्या शिक्कामोर्तबसाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार असून त्यानंतर त्यांच्या आदेशानुसार मुसळगाव वासनेचा बाजार पूर्णपणे ‘सील’ करण्यात येणार असल्याचे दराडे यांनी सांगितले. एकूणच या संपुर्ण कारवाईकडे आता नाशिक जिल्ह्याचे नव्हे तर राज्याचे लक्ष लागले आहे.जिद्द, चिकाटी अन् संघर्षाच्या जोरावर ‘त्या’ पिडितेने दाखविले धाडसजीद्द, चिकाटीच्या जोरावर वासनेच्या बाजारातून बाहेर पडण्यासाठी ‘त्या’ पिडित बालिकेने सातत्याने दहा महिने संघर्ष करीत यश मिळविले. कुंटणखान्याच्या भींती भेदून तिने कोलकात्यावरून पलायन करुन नाशिक गाठले. तीन महिने नाशिकमध्ये जीव मुठीत घेऊन राहणा-या पिडित मुलीने अखेर धाडस केले आणि माध्यमांसमोर येऊन ‘खाकी’च्या क्रूरतेपासून तर बांग्लादेश-भारत सीमेवरून होणा-या मुलींच्या तस्करीचा पर्दाफाश केला.