- नामदेव भोरनाशिक - गावठी कटट्यासह धारदार गुप्ती कटावणी अशा हत्यारांसह शहरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच संशयितांच्या टोळीचा दरोड्याचा प्रयत्न भद्रकाली पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उधळन लावला असून पोलिसांनी पाचही संशयितांना बेड्या ठोकल्या आहे. त्यांच्याकडून देशी बनावटीच्या गावठी कट्ट्यासह एक मॅग्झीन , चार जिवंत काडतुसे,गुप्ती व कटावणी सारखे घरफोडीची हत्यारे आणि चारचाकी वाहन असा सुमारे ८ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केली आहे.
भद्रकाली पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने जळगावच्या चाळीसगाव येथील विशाल ओमप्रकाश राजभर, (३०, रा. डेअरी एरिया, हिरापुर रोड) अजय हिरामण राठोड (१९), शोएब अस्लम शेख, (२५ दोघे रा. नागदरोड आठवडे बाजार) दानिश रशिद मनियार, ( २२ रा. नयागांव इस्लामपुरा) नुरुद्दीन शरिफुद्दीन शेख (२७ , रा. हुडको कॉलनी नगरपालिका मंगल कार्यालयाजवळ) एका चारचाकी कारमधून काठगल्ली भागात दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना मुसक्या आवळल्या आहेत. गुन्हे शोध पथकाचे पोलिस अंमलदार धनंजय हासे यांना काठे गल्ली परीसरात स्विफ्ट कारमध्ये संशयित फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्याआधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक किशोर खांडवी, एस.डी. बिडगर, पोलिस नाईक रमेश कोळी, लक्ष्मण ठेपणे, शेळके, सागर निकुंभ, एम. व्ही. बोरसे, सोनार, गायकवाड यांच्या पथकाने गुरुवारी (दि.६) मध्यरात्री दिड वाजेच्या सुमारास काठेगल्ली सिग्नलजवळ नाशिक पुणे रोडवर नाशिक येथे स्विफ्ट कार (एमएच ०३, डीएक्स ७७११) मधून दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी बनावटीच्या गावठी कट्ट्यासह एक मॅग्झीन , चार जिवंत काडतुसे,गुप्ती व कटावणी सारखे घरफोडीची हत्यारे पोलिसांनी जप्त केल्याची माहिती परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त डॉ.किरणकुमार चव्हाण यांनी दिली.-