शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे आज असते, तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं असतं का?; धनंजय मुंडे म्हणाले...
2
माझी लाडकी बहीण योजना बंद होण्याची चर्चा; अदिती तटकरेंनी केला खुलासा 
3
Bhagyashree Navtake IPS: १२०० कोटींचा घोटाळा, सीबीआयचा गुन्हा; कोण आहेत भाग्यश्री नवटके?
4
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शिवसेनेत, जेलमधून परतताच पक्षप्रवेश
5
IND A vs Pak A : 'हायहोल्टेज' मॅच! युवा टीम इंडियानं दिला पाकिस्तान 'अ' संघाला दणका
6
Maharashtra Election 2024: नितीन गडकरींच्या घरी फडणवीस-बावनकुळेंचे 2 तास खलबते
7
IND vs PAK : कॅचेस विन मॅचेस! Ramandeep Singh च्या अफलातून कॅचनं फिरली मॅच (VIDEO)
8
Noel Tata: नोएल टाटांची पत्नी कोण? त्यांना कोणत्या गोष्टींची आहे आवड?
9
Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?
10
राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी; पुतणीने शरद पवारांना विचारला खरमरीत सवाल!
11
‘वंचित’कडून विधानसभेसाठी आणखी १६ उमेदवारांची घोषणा; साताऱ्यातील २ जागांचा समावेश!
12
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
13
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
15
Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा
16
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
17
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
18
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
19
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
20
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...

नाशिकचा टपाल बटवडा ठप्प; ३२४ पैकी ११९ कार्यालयांत कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2020 6:11 PM

सर्व केंद्र अस्थापनेतील रिक्त असलेले एकूण ६ लाख पदे त्वरित भरावी. ग्रामिण डाकसेवकांना खात्यात समाविष्ट करा. ग्रॅच्युटी ५ लाख करावी. निवृत्तीचे सर्व आर्थिक लाभ निवृत्तीच्या दिवशी दिले जावे, अशा विविध मागण्यांसाठी टपाल कर्मचा-यांनी संपात उडी घेतली.

ठळक मुद्देकेवळ २११ कर्मचा-यांनी कार्यालयांत हजेरी लावली६२७ कर्मचारी संपात सहभागी

नाशिक : सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ विविध संघटनांनी बुधवारी (दि.८) पुकारलेल्या देशव्यापी संपात टपाल कर्मचाऱ्यांनीही सहभाग नोंदविला. शहरी भागातील पोस्टमनपासून ग्रामिण डाकसेवकांसह मेल वाहने चालविणारे चालक संपात उतरल्याने शहरासह जिल्ह्याचे टपाल ‘जैसे-थे’ पडून राहिले. संपुर्ण दिवसभर आलेल्या टपालाचा बटवडा नाशिक मुख्य टपाल कार्यालयातून अन्य उपकार्यालये, शाखा कार्यालयांपर्यंतदेखील होऊ शकला नाही. तसेच नाशिक टपाल विभागातील एकूण ८३८ कर्मचाऱ्यांपैकी केवळ २११ कर्मचा-यांनी आपआपल्या कार्यालयांत हजेरी लावली. एकूण ३२४ पैकी ११९ कार्यालयांमध्ये कामकाज पार पडले.नवीन पेन्शन योजना रद्द करावी. सर्व कर्मचा-यांना अखेरच्या पगाराच्या ५० टक्क्यांपर्यंत एवढी रक्कम किमान पेन्शनची हमी द्यावी. २०१६पासून थकलेला घरभाडे भत्ता द्यावा. सातव्या वेतनआयोगाच्या अंमलबजावणीतील सर्व त्रुटी दूर कराव्या. सर्व केंद्र अस्थापनेतील रिक्त असलेले एकूण ६ लाख पदे त्वरित भरावी. ग्रामिण डाकसेवकांना खात्यात समाविष्ट करा. ग्रॅच्युटी ५ लाख करावी. निवृत्तीचे सर्व आर्थिक लाभ निवृत्तीच्या दिवशी दिले जावे, अशा विविध मागण्यांसाठी टपाल कर्मचा-यांनी संपात उडी घेतली.आॅल इंडिया पोस्ट एम्प्लॉईज युनियन, नॅशनल असोसिएशन आॅफ पोस्टल एम्प्लॉईज, ग्रूप सी, पोस्टमन व ग्रूप डी, आॅल इंडिया ग्रामीण डाकसेवक युनियन अशा तीनही संघटनांचे सदस्यांनी संपात सहभाग नोंदविला. यामुळे नाशिक शहरातील मुख्य टपाल कार्यालयापासून या कार्यालयांतर्गत येणारे सर्व उपक ार्यालये, शाखा कार्यालयांसह ग्रामीण भागातील टपालाचा बटवडा ठप्प झाला. सकाळच्या सुमारास टपाल कर्मचाºयांसह पोस्टमन, ग्रामीण डाकसेवकांनी एकत्र येत मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बैठक घेत जोरदार घोषणाबाजी करत मोर्चात सहभाग घेतला६२७ कर्मचारी संपात सहभागीमुख्य टपाल कार्यालयाच्या अखत्यारितितील १२३ पोस्टमनपैकी केवळ ३५ पोस्टमन, एमटीएसचे ५७ पैकी १४ तर ग्रामीण डाकसेवक ३८६ पैकी केवळ ७८ आणि अन्य कार्यालयीन कर्मचारी ४७ सुपरवायझरसह अन्य पदांवरील २२५ अधिकाºयांपैकी ८४ असे एकूण २११ कर्मचाºयांनी नियमितपणे क र्तव्य बजावले. याव्यतिरिक्त ८३८ कर्मचाºयांनी मात्र संपात सहभागी होणे पसंत केले. परिणामी शहरासह जिल्ह्याती टपालसेवा प्रभावित झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. नाशिक मुख्य टपाल कार्यालयतील बटवडा कक्षात पोस्टमन नजरेस पडले नाही. संघटनांच्या पदाधिकाºयांनी सुमारे ९२५ पैकी ८०० कर्मचारी संपात सहभागी असल्याचा दावा केला; मात्र प्रवर अधिक्षक कार्यालयाकडून केवळ ६२७ कर्मचारी संपावर असल्याचे सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकPost Officeपोस्ट ऑफिसStrikeसंप