- सुनील गायकवाडनाशिक - टोमॅटोचे दर वाढताच नेपाळकडून आयात केले जातात, कांद्याचे दर वाढतील या भीतीने ४० टक्के निर्यात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला जातो. शासनाने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना व विद्यार्थी सेनेतर्फे तीव्र आंदोलन केले जाईल, असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष महेश लासुरे यांनी तहसीलदारांना सादर केले.
केंद्र सरकार देशांतर्गत बाजारपेठेतील वाढत्या किमतींना लगाम घालण्यासाठी कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जो कांदा २४०० रुपये प्रति क्विंटल विकला जात होता, तो आता या निर्णयाने पंधराशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल विकला जाऊ लागला आहे. यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. राजेश पटेल, जिल्हा सरचिटणीस रामदास लासुरे, तालुकाध्यक्ष नकुल पाटील घागरे, शहराध्यक्ष गौरव कांबळे, शहर संघटक शैलेश कर्पे, तालुका उपाध्यक्ष विजय बोरसे, मनविसेचे जिल्हा उपाध्यक्ष सागर शेळके, जिल्हा सचिव आकाश ठोंबरे, जिल्हा सहसचिव गोरख खोडके, जिल्हा सरचिटणीस सागर खोडके, तालुकाध्यक्ष प्रवीण खैरनार, शहराध्यक्ष लखन शिंदे, शहर उपाध्यक्ष अक्षय पंडोरे, तालुका सचिव आकाश गायकवाड, तालुका संघटक नीलेश साताळकर, तालुका सरचिटणीस जालिंदर पवार, तालुका उपाध्यक्ष गणेश आहेर, तालुका उपाध्यक्ष रामा जांभळे, आकाश गुंजाळ, सचिन गायकवाड, दीपक गुंजाळ, विलास सूर्यवंशी, चेतन गायकवाड, विकास लहरे, वेदांत कुलभैय्या, शुभम अहिरे, ज्ञानेश्वर सातारकर, सोनू लव्हाळे, लकी गायके आदी उपस्थित होते.