नाशिक : एका सुशिक्षित बेरोजगार युवकाला नोकरीला देण्यासाठी सुमारे वीस हजारांच्या लाचेची मागणी करुन लाचेली स्विकारताना सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता रामदास सोन्याबापू कांबळेसह वरिष्ठ लिपिक आप्पा शिवराम केदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी (दि.१) रंगेहाथ पकडले.याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी, एका सुशिक्षित बेरोजगार युवकाने नोकरीसाठी विद्युत विभागाकडे अर्ज केला होता. त्याला बोलावून घेत कांबळे व केदार यांनी नोकरी देण्याच्या हेतूने वीस हजार रुपयांची मागणी त्या युवकाकडे केली. सदर युवकाने होकार दर्शवून कार्यालयातून काढता पाय घेतला; मात्र थेट लाचलुचपत प्रतिधंबक विभागाचे कार्यालय गाठले. वीस हजार रुपयांची लाचेची मागणी अधिकारी-कर्मचा-यांकडून केली जात असल्याची तक्रार दिल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या पथकाने गुरूवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या आवारात सापळा रचला. तक्रारदार युवक वीस हजार रुपयांची रक्कम देण्यासाठी कांबळे यांच्याकडे गेला असता कांबळे याने ती रक्कम केदारकडे देण्यास सांगून प्रोत्साहन दिल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हटले आहे. त्याच्याकडून रक्कम स्विकारली व त्याचवेळी पथकाच्या अधिका-यांनी कांबळेसह केदारलाही ताब्यात घेतले. युवकाने विद्युत अभियंता नोंदणीसाठी सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग कार्यालयात अर्ज केला होता.
नाशिक सार्वजनिक बांधकाम विभाग : वीस हजारांची लाच स्विकारताना वरिष्ठ लिपिकासह अभियंत्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 9:37 PM
नाशिक : एका सुशिक्षित बेरोजगार युवकाला नोकरीला देण्यासाठी सुमारे वीस हजारांच्या लाचेची मागणी करुन लाचेली स्विकारताना सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता रामदास सोन्याबापू कांबळेसह वरिष्ठ लिपिक आप्पा शिवराम केदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी (दि.१) रंगेहाथ पकडले.याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी, एका सुशिक्षित बेरोजगार युवकाने नोकरीसाठी विद्युत विभागाकडे ...
ठळक मुद्देवीस हजार रुपयांची लाचेची मागणी अधिकारी-कर्मचा-यांकडून केली जात असल्याची तक्रार युवकाने विद्युत अभियंता नोंदणीसाठी अर्ज केला होता.